Tuesday, May 7, 2024
घरमानिनीHealthहेल्दी sex life साठी डाएट मध्ये घ्या 'हे' व्हिटॅमिन

हेल्दी sex life साठी डाएट मध्ये घ्या ‘हे’ व्हिटॅमिन

Subscribe

आजही आपल्याकडे सेक्स आणि त्यावरील विषयांवर मोकळेपणाने बोलले जात नाही. चांगले सेक्स लाईफ हे केवळ रिप्रोडक्शन साठीच नाही तर अनेक कारणांसाठी महत्वाचे असते. आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींचा जसा आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होत असतो तसाच सेक्स लाईफवर सुद्धा परिणाम होत असतो आणि आपल्यापैकी अनेकांना हे ठाऊक नसते. पण काही व्हिटॅमिन्सच्या सेवनाने तुम्ही तुमची सेक्स लाईफ सुधारू शकता.

Healthy Relationships: 6 Tips to Create Harmony at Home

- Advertisement -

व्हिटॅमिन सी
‘व्हिटॅमिन सी’ केवळ प्रतिकारशक्तीसाठीच नाही तर सेक्स लाईफ सुधारण्यासाठीही उपयोगी आहे. जर तुमच्यात ‘व्हिटॅमिन सी’ ची कमतरता असेल तर तुमची लैगिंक इच्छा कमी होऊ शकते. यासाठी तुम्ही ‘व्हिटॅमिन सी’ ने परिपूर्ण असलेली फळे जसे की, संत्री, ब्रोकोली, लिंबू, आवळा खायला हवेत.

व्हिटॅमिन डी
‘व्हिटॅमिन डी’ हे दात, हाडे यासाठी उपयोगी असते हे तर सर्वांना माहीतच आहे. अंडी, दूध, मासे, मशरूम, चीज यासारख्या पदार्थांचा आहारात समावेश केल्यास ‘व्हिटॅमिन डी’ ची पातळी वाढवता येते. जर तुमच्यात ‘व्हिटॅमिन डी’ ची कमतरता असेल तर याचा तुमच्या सेक्स लाईफवर परिणाम होऊ शकतो. यासाठी तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार व्हिटॅमिन डी च्या सम्प्लिमेंट्स घेऊ शकता.

- Advertisement -

व्हिटॅमिन बी १२
शरीरात ‘व्हिटॅमिन बी १२’ ची पातळी कमी झाल्यामुळे तुमच्या सेक्स लाईफवर याचा परिणाम होऊ शकतो. जर याची पातळी खूपच कमी झाली असेल तर व्यक्ती लैगिक संबंध ठेवण्याची इच्छा गमावू शकते. त्यामुळे तुम्ही जर या समस्येतून जात असाल तर तुमच्या आहारात अंडी, मांस, चिकन, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ याचा समावेश करा.

 


हेही वाचा; महिलांना ‘या’ कारणांमुळे होते युरीन इन्फेक्शन

- Advertisment -

Manini