Tuesday, December 10, 2024
Maharashtra Assembly Election 2024
घरमानिनीHealthमहिलांना 'या' कारणांमुळे होते युरीन इन्फेक्शन

महिलांना ‘या’ कारणांमुळे होते युरीन इन्फेक्शन

Subscribe

बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक महिलांना युरीन इन्फेक्शनची समस्या भेडसावत आहे. सुमारे ५० टक्के स्त्रिया या त्रासाला सामोरे जात आहेत. वास्तविक पाहता, यामागे अनेक कारणे आहेत. पाहुयात, युरीन इन्फेक्शन म्हणजे काय? त्याची कारणे
आणि त्यावरील उपाय.

Here's what you can do to avoid painful urinary tract infections - The Washington Post

- Advertisement -

युरीन इन्फेक्शन म्हणजे काय?
युरीन इन्फेक्शन म्हणजे युरिनमध्ये बॅक्टेरीयांचे संक्रमण होणे. याला युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन अर्थात ‘युटीआय’ असे म्हटले जाते. युरिनरी ब्लॅडर आणि त्याच्या नळ्या ज्यावेळी बॅक्टेरियानी संक्रमित होतात. तेव्हा त्याला युटीआय म्हटले जाते. तसेच हे बॅक्टेरिया मूत्रमार्गातून शरीरात प्रवेश करतात आणि मूत्राशय, किडनीला इजा देखील करतात.

युटीआय कशामुळे होते?

- Advertisement -

लैगिक संपर्कामुळे –
महिलांच्या शारीरिक रचनेमुळे शारीरिक संबंधानंतर त्यांना युटीआय होण्याची शक्यता असते. लैगिक संपर्कामुळे योनीजवळील मूत्रमार्गात बेक्टेरिया येऊ शकतात.

गर्भनिरोधक औषधांमुळे –
गर्भनिरोधक औषधे वारंवार घेऊन युटीआय होऊ शकतो.

मेनोपॉजमुळे –
जसजसे तुमचे वय आणि इस्ट्रोजेनचे प्रमाण कमी होत जाते तसतसे तुमचे व्हजायनल टिशू पातळ होत जातात. याने संसर्गाचा धोका हा अधिक वाढतो.

प्रेगन्सीमुळे –
गर्भवती महिलांना देखील यूटीआय होण्याचा धोका जास्त असतो. गंभीर इन्फेक्शनमुळे तुम्हाला आणि तुमच्या बाळाला समस्या निर्माण होऊ शकतात. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला UTI आहे, तर लवकरात लवकर तुमच्या स्त्रीरोग तज्ञाशी संपर्क साधा.

युटीआय वरील उपचार

तांदळाचे पाणी ठरेल उपयोगी –
तांदळाचे पाणी यूटीआयच्या समस्या कमी करण्यास मदत करते. यासोबतच अ‍ॅसिडिटी आणि क्रॅम्पससाठी देखील उपयोगी आहे. तांदळाच्या पाण्यामध्ये नैसर्गिक गुणधर्म असतात ज्याने युटीआयमुळे होणारी जळजळ कमी होण्यास मदत होते.

प्रोबायोटिक्सचे सेवन करा –
आपल्या आहारात दहीसारख्या प्रोबायोटिक्सयुक्त पदार्थांचा अवश्य समावेश करा. प्रोबायोटिक्स पदार्थ आतड्यात फायदेशीर बॅक्टरीयाच्या वाढीस प्रोत्साहन देतात. जे युरिनरी ट्रॅक्टमध्ये निरोगी संतुलन राखण्यास मदत करू शकतात.

भरपूर पाणी प्या –
युटीआयमुळे लघवीला त्रास होऊ शकतो. यासाठी भरपूर प्रमाणात पाणी पिणे गरजेचे आहे. याने तुम्ही वारंवार लघवी कराल आणि लघवीतून बॅक्टेरिया लवकर बाहेर पडतील. तुमचा त्रास आणि अस्वस्थता देखील कमी होईल. तुमची UTI समस्या गंभीर नसल्यास, तुम्ही एक-दोन दिवसांत बरे होऊ शकता.

जर तुम्हाला संसर्ग झाला असेल तर चांगल्या स्वच्छतेकडे लक्ष द्या आणि या काळात मिरची, मसालेदार, तेलकट अन्न आणि अल्कोहोलचे सेवन टाळा. UTI ची समस्या गंभीर होणार नाही याची खात्री करण्यासाठी, आपल्या डॉक्टरांशी अवश्य संपर्क साधा.

 


हेही वाचा ; बाळाचे दात येत आहेत ? मग अशी घ्या काळजी

- Advertisment -

Manini