Wednesday, May 15, 2024
घरमानिनीJewellery Clean Tips : सोन्याच्या अलंकारांची चमक कमी झालीये, मग वापरा 'या'...

Jewellery Clean Tips : सोन्याच्या अलंकारांची चमक कमी झालीये, मग वापरा ‘या’ टीप्स

Subscribe

घराच्या घरी अगदी सोप्या पद्धतीत सोन्याचे दागिने स्वच्छ करता येतात.

सोने हा धातू महागड्या धातूंमध्ये गणला जातो.  जवळपास प्रत्येकाकडे सोन्याचे दागिने असतात. अशातच त्यांच्या देखभालीकडे लक्ष देणे खूप महत्वाचे आहे. सोनेदेखील सतत परिधान केल्यामुळे काही काळानंतर ते काळे दिसू लागतात.

शरीरातून बाहेर पडणारा घाम आणि घाण यांच्या संपर्कात आल्यानंतर सहसा सोन्याचे दागिने काळे होतात. पण सोन्याच्या दागिन्यांची चमक कमी करण्याचे आणखी एक कारण म्हणजे मेकअप. तुम्ही जवळपास वापरत असलेले परफ्यूम, मॉइश्चरायझर किंवा कॉस्मेटिक देखील सोन्याचे दागिने घाण करण्यासाठी काम करतात.  त्यामुळे देखील सोन्याचे दागिने काळे पडतात.

- Advertisement -
How to clean gold Jewellery at home | आसान तरीका सोना चमकाने का - YouTube
सोन्याचे दागिने पॉलिश करण्याचे काही घरगुती उपाय तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतात-

1. बेकिंग सोड्याच्या मदतीने सोन्याचे दागिने चमकवा-

  • बेकिंग सोडा स्वयंपाकात सर्रास वापरला जातो. याच्या वापराने सोन्याचे दागिने देखील स्वच्छ करू शकतो.
  • यासाठी फक्त 2 चमचे सोडा कोमट पाण्यात विरघळवून त्याची पेस्ट बनवायची आहे.
  • यांनतर दागिने त्यात अर्धा तास बुडवून ठेवा.
  • नंतर स्पंजने हलक्या हाताने घासून स्वच्छ करा.

How To Clean a Gold Chain: Cleaning Options That Work Every Time

- Advertisement -

2. लिंबूच्या पाण्याने सोन्याचे दागिने करा स्वच्छ-

  • लिंबूमध्ये नैसर्गिकरित्या साफ करणारे घटक असतात.
  • यासाठी एका भांड्यात गरम पाण्यात अर्धा लिंबू पिळून घ्या.
  • त्यानंतर त्यात 20-30 मिनिटे दागिने राहू द्या.
  • हे झाल्यावर ब्रशने हळूवारपणे दागिने स्वच्छ करा आणि स्वच्छ पाण्याने धुवून घ्या.

How To clean Gold Jewellery : काळवंडलेल्या सोन्याच्या दागिन्यांना पुन्हा नव्यासारखे चमकवायचे आहे ? स्वयंपाकघरातील या 4 पदार्थांचा करा वापर | Quickest way to ...

3. सोने साफ करण्याची ही पद्धत देखील तुम्ही वापरू शकतात-

  • सोन्याचे दागिने स्वच्छ करण्यासाठी, टूथब्रशला टूथपेस्ट लावा.
  • यांनतर या वरची घाण काढण्यासाठी दागिने हलक्या हाताने घासून घ्या.
  • यासोबत टूथब्रशऐवजी मऊ कपड्याचा देखील वापर करू शकता.
  • यानंतर मऊ कपड्याने पुसून घेतल्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून घ्या.

How to Clean Gold Jewelry with Toothpaste the Safe Way

- Advertisment -

Manini