घरपालघरवाड्यातील आरोग्य सेवा कोलमडलेलीच

वाड्यातील आरोग्य सेवा कोलमडलेलीच

Subscribe

तालुक्यात सध्या सर्दी ,खोकला, ताप व इतर आजांराचे रुग्ण आहेत. सरकारी व खाजगी रुग्णालयात या रुग्णांची गर्दी पहावयास मिळत आहे.

वाडा : वाडा तालुक्यातील बहुसंख्य भाग हा आदिवासी लोकवस्तीचा असल्याने काही ठिकाणी आरोग्य व्यवस्था कुचकामी ठरत आहे. अनेक वाड्या वस्तीवर रस्तेच नसल्याने तेथे आरोग्य कर्मचारी ही वेळेवर पोहोचू शकत नाही, अशी परिस्थिती आहे . असे असतानाही वाड्यात सर्व आरोग्य केंद्र व उपकेंद्रांमध्ये वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, यांची संख्या पुरेशी असल्याचे प्रशासनातील अधिकारी सांगतात. प्रत्यक्षात काही ठिकाणी पदे रिक्त असल्याचे निदर्शनास आले आहे. तालुक्यात सध्या सर्दी ,खोकला, ताप व इतर आजांराचे रुग्ण आहेत. सरकारी व खाजगी रुग्णालयात या रुग्णांची गर्दी पहावयास मिळत आहे.

तालुक्यात ४ आरोग्य केंद्र, ३८ उपकेंद्र असून चार आरोग्य केंद्रासह ३८ डॉक्टर आणि ३८ आरोग्य सेविकांसह सर्व पदे भरलेली असल्याचे प्रशासन सांगत आहे. परंतु, आरोग्य सेवकांची 30 पदे मंजूर असून 21 पदे भरलेली आहेत तर नऊ पदे रिक्त आहेत. एवढ्या कर्मचार्‍यांचा फौज फाटा असताना वाड्यातील आरोग्य सेवा मात्र कूच कामी असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.गावातील आरोग्य उपकेंद्रामध्ये पूर्णवेळ डॉक्टर दिले असताना येथील आदिवासी पदरमोड करून खाजगी दवाखान्यात जाऊन उपचार का घेतील हे न सुटणारे कोडे आहे. प्रत्यक्षात परिस्थिती मात्र वेगळी आहे. बहुसंख्य उपकेंद्रांमध्ये फक्त आरोग्य सेविकास हजर असल्याचे पहावयास मिळत आहे. काही खेड्यातील आदिवासी नागरिकांना सर्प, विंचू चावल्यास रातोरात इतरत्र भटकंती करावी लागत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -