Monday, April 29, 2024
घरमानिनीHealthHeatstroke- उन्हाळ्यात उष्माघातापासून असा करा बचाव

Heatstroke- उन्हाळ्यात उष्माघातापासून असा करा बचाव

Subscribe

उन्हाळा सुरू झाला असून उन्हाचा कडाका दिवसागणिक वाढत आहे. अनेक ठिकाणी उष्माघातामुळे लोक गंभीर आजारी पडू लागते आहेत. सकाळची सूर्य़किरणेही प्रखर असल्याने लोकांचे घराबाहेर पडणेही कठीण झाले आहे. यामुळे तीव्र सूर्यप्रकाश आणि उष्माघात टाळण्यासाठी खबरदारी घेण्याची गरज आहे.

तीव्र उन्हामुळे उन्हाळ्यात डिहायड्रेशनचा धोका वाढतो. यामुळे या ऋतूत विशेष काळजी घ्यावी लागते. मग ती मुले असोत, तरुण असोत की वृद्ध? प्रचंड उष्णता, कडक सूर्यप्रकाश आणि उष्ण वारे यांमुळे उष्माघाताची शक्यता लक्षणीय वाढते. उष्माघातामुळे तुम्ही गंभीर आजारी पडू शकता.

- Advertisement -

बाहेर जाताना या गोष्टींची घ्या विशेष काळजी 

- Advertisement -

उन्हाळ्यात उष्णतेमुळे त्वचेवर पुरळ उठू लागते. त्यामुळे सनबर्न आणि उष्माघाताचा धोका वाढतो. या ऋतूमध्ये लहान मुलं,तरुण, किंवा वृद्धांनी घराबाहेर कारण नसताना अजिबात जाऊ नये. कारण यामुळे शरीरात पाणी कमी होऊ लागते.

द्रव पदार्थ

या दिवसात जर लहान मुले, वडीलधारी मंडळी घराबाहेर पडत असतील तर त्यांनी डोकं आणि चेहऱ्याभोवती स्कार्फ गुंडाळून बाहेर पडावे. सुती किंवा सैल कपडे घालावे. घरातून बाहेर पडताना नेहमी छत्री किंवा टोपी सोबत ठेवावी . त्यामुळे सूर्यकिरणांपासून स्वतःचे संरक्षण होईल.

तसेच उन्हाळ्यात सतत घाम येत असल्याने घामावाटे आणि लघवीवाटे शरीरातील पाणी बाहेर टाकले जाते. यामुळे शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते. यासाठी पाणी मुबलक प्यावे.

काय कराल?
उन्हाळ्यात शरीरात पाण्याची कमतरता झाल्यास उष्माघाताचा धोका संभवतो. या काळात चक्कर येण्याची शक्यताही वाढते. उष्माघात झाल्यास पीडितेने सावलीत उभे राहावे किंवा ओल्या कपड्याने शरीर व्यवस्थित पुसावे. मग लगेच जवळच्या हॉस्पिटलचा सल्ला घ्या. याशिवाय रस्त्यावर चालतानाही तोंड कोरडे पडू शकते. जर तुम्हाला वारंवार तहान लागत असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या रुग्णालयात जावे. हा द्रव आहार अतिशय महत्त्वाचा आहे. सत्तू, लस्सी,, बेल शरबत आणि टरबूज रोज खावे. ताक प्यावे. जेणेकरून शरीर डिहायड्रेड राहते.

- Advertisment -

Manini