Wednesday, May 1, 2024
घरमानिनीरागीट जोडीदाराला हँडल कसं करायचं ?

रागीट जोडीदाराला हँडल कसं करायचं ?

Subscribe

राग येणं ही तशी सामान्य बाब आहे. पण जर तुमच्या जोडीदाराचा स्वभावचं रागीट असेल तर तुम्हांला नेहमी समजुतदाराच्या भूमिकेत राहावं लागेल. कारण सततच्या कटकटीतून आणि रागातून नात्यामध्ये तणाव निर्माण होण्याचीच शक्यता अधिक असते.

यामुळे जर तुमचे पार्टनरवर प्रेम असेल तर त्याच्या सततच्या रागावण्यामुळे निराश न होता त्याला समजून घ्या. त्याच्या रागाचे मूळ कारण शोधून काढा कदाचित त्यातून तुमच्यात हरवत चाललेला वाद संपुष्टात येऊ शकतो.

- Advertisement -

कारण सहसा विनाकारण कोणीही रागवत नाही. पण जर पार्टनरचा स्वभावचं रागीट, संतापी असेल तर तो जेव्हा रागवतो तेव्हा तुम्ही शांत राहा. शब्दाने शब्द वाढतो. यामुळे तुम्ही समोरची व्यक्ती शांत झाल्यावर त्याच्याशी चर्चा करा.

- Advertisement -

कदाचित तुमच्या काही गोष्टी त्याला आवडत नसतील. तर त्या करु नका. कारण त्यामुळे तुमच्या जोडीदाराला पुन्हा चीड येण्याची शक्यता आहे. यामुळे तुमच्यात वाद होतील अशा गोष्टी घडणार नाहीत याची काळजी घ्या.

कधी कधी रागाचा आणि भूतकाळात घडलेल्या काही अप्रिय, धक्कादायक घटनांचाही संबंध असतो. यामुळे ज्या गोष्टींवरून तुमचा पार्टनर चिडचिडा झाला आहे. त्याचाही विचार करा.

तज्ज्ञांच्या मते जर भूतकाळातील एखाद्या अप्रिय घटनेसारखीच घटना किंवा प्रसंगाला तुमचा पार्टनरला सामोरे जावे लागत असेल. तर ते ही त्याच्या रागीट स्वभावाचे कारण असू शकते.पण जर पार्टनरच्या नाराजीचे कारण समजूनही तुम्ही सतत त्याच गोष्टी करत असाल तर तुमच्याबद्दल त्याच्या भावना गोठू लागतील.

 

तुम्ही जाणीवपूर्वक त्याला त्रास देण्यासाठी असे करत आहात असा त्याचा समज होईल. त्यामुळे त्याचा तुमच्यावरील विश्वास कमकुमवत तर होईलच शिवाय तो तुमच्यापासून मनाने कायमचे दूर जाईल.

तसेच जर तुमच्या पार्टनरबरोबर चर्चा करताना एखाद्या मुद्द्यावरून तुमच्यात मतभेद होण्याची शक्यता असेल. तर विषय बदला. पार्टनरच्या आवडत्या विषय़ावर बोला. गरज पडल्यास तज्ज्ञांच्या सल्ला घेऊन जोडीदाराला अँगर मॅनेजमेंट करायला सांगा.

- Advertisment -

Manini