Thursday, May 16, 2024
घरमानिनीHealthखुल्या हवेत धावण्याच्या तुलनेत ट्रेडमिलवर धावणे फायद्याचे ठरते?

खुल्या हवेत धावण्याच्या तुलनेत ट्रेडमिलवर धावणे फायद्याचे ठरते?

Subscribe

आजकाल आरोग्याच्या बाबतीत लोकांमध्ये जागरूकता वाढली आहे. विशेषतः लोक फिटनेसच्या बाबतीत अधिक काळजी घेत आहे. यामागचे कारण काहीही असले तरी फिटनेस आणि आरोग्य याकडे लोकांचा कल हे सकारात्मकतेचे लक्षण आहे. धावणे हे आरोग्यासाठी फायद्याचे मानले जाते. पण, बऱ्याच जणांना जिमला जाऊन एक्सरसाईज करायला आवडत असल्याने ते ट्रेडमिलवर धावणे पसंत करतात. पण आजही खुल्या हवेत धावण्याच्या तुलनेत ट्रेडमिलवर धावणे फायद्याचे ठरते का? असा प्रश्न अनेकांना पडतोच.

ट्रेडमिलवर चालण्याचे फायदे –

- Advertisement -

1. ट्रेडमिलवर धावणे वजन कमी करण्यासाठी उपयुक्त मानण्यात आले आहे. याद्वारे तुम्ही दररोज ठराविक कॅलरीज बर्न करून तुमचा फिटनेस राखू शकता.
2. ट्रेडमिलवर चालणे किंवा लयीत धावणे ब्लड सर्क्युलेशन सुधारते. जे हृदयाच्या आरोग्यासाठी फायद्याचे आहे.
3. ट्रेडमिलवर धावण्यासाठी स्नायूंचा वापर जास्त होतो. ज्याने स्नायू मजबूत होतात.
4. ट्रेडमिलवर धावणे हाडांच्या आरोग्यसाठी फायदेशीर आहे. याने हाडांची घनता वाढते आणि हाडे मजबूत होतात.
5. ट्रेडमिलवर धावल्याने मानसिक आरोग्यालाही फायदा होतो. वास्तविक पाहता, जेव्हा तुम्ही ट्रेडमिलवर लयीत धावता तेव्हा ते शरीरातील डोपेमाईन आणि एन्डोफ्रिन नावाच्या आनंदी हार्मोन्सचे सर्क्युलेशन वाढवते, जे मानसिक स्वास्थासाठी चांगले असते.

खुल्या हवेत धावण्याच्या तुलनेत ट्रेडमिलवर धावणे फायद्याचे ठरते?

- Advertisement -

खुल्या हवेत धावण्याच्या तुलनेत ट्रेडमिलवर धावणे फायद्यचे का? असा विचार करायला गेल्यास तज्ञांच्या मते, दोन्ही गोष्टी करण्याच्या मर्यादा असून दोन्हीचे फायदे आणि तोटे वेगळे आहेत. ट्रेडमिल चालवताना तुम्ही शुद्ध हवा, सूर्यप्रकाश, निसर्गाच्या आनंदापासून वंचित राहता. एक लक्षात घ्या, जेव्हा ट्रेडमिलचा विचार केला जातो तेव्हा तुम्ही केवळ यंत्राच्या साहाय्याने धावत आहात, जे कॅलरी बर्न करण्याच्या दृष्टीने अधिक फायदेशीर असू शकते. मात्र, याने मानसिक स्वास्थाला फायदा होत नाही.
जेव्हा तुम्ही सकाळच्या शुद्ध हवेत धावत तेव्हा मानसिक आरोग्याला अनेक फायदे होतात. यासोबत फुफ्फुसाचे आरोग्य सुधारते. सूर्यप्रकाशाच्या संपर्कात राहिल्याने हाडांसाठी फायद्याचे असणारे ‘व्हिटॅमिन डी’ मिळते. पण,जर तुम्ही प्रदूषण जास्त असणाऱ्या ठिकाणी राहात असाल तर बाहेर धावणे आरोग्यसाठी हानिकारक ठरू शकते. अशा परिस्थितीत ट्रेडमिल रनिंग हा अनेक बेस्ट ऑप्शन आहे.

 

 


हेही वाचा; अपूर्ण झोपेमुळे होऊ शकतात ‘हे’ आजार

- Advertisment -

Manini