Thursday, April 18, 2024
घरमानिनीHealthपिरीएड्समध्ये व्यायाम करण्याचे फायदे

पिरीएड्समध्ये व्यायाम करण्याचे फायदे

Subscribe

स्वतःला शारीरिकदृष्ट्या तितके ऍक्टिव्ह ठेवले जाते तेवढेच आपण निरोगी राहतो. पण, पिरीएड्सदरम्यन, व्यायाम करायचा का नाही याबद्दल आजही अनेक जणींमध्ये संभ्रम दिसून येतो. आरोग्य तंज्ञांच्या मते, पिरीएड्स दरम्यान, व्यायाम करणे कोणत्याही प्रकारे हानिकारक नसून फायदेशीर आहे. या दिवसात शरीरात अनेक हार्मोनल बदल होतात, ज्यामुळे जास्त थकवा आणि अशक्तपणा जाणवतो. त्यामुळे य समस्येला सामोरे जाण्यासाठी व्यायाम करणे खूप फायदेशीर ठरते.

व्यायाम करण्याचे फायदे – 

- Advertisement -

पिरीएड्सदरम्यान, वेदना वाढतात आणि थकवाही अधिक जाणवतो. व्यायाम केल्याने या व्याधी कमी होऊ शकतात.

पिरीएड्सदरम्यान, कोणत्याही प्रकारचा वर्कआउट केल्याने एन्डोफ्रिन नावाचे हार्मोन बाहेर पडते, ज्यामुळे वेदना कमी होतात.

- Advertisement -

व्यायामाने शरीरातील रक्तसंचार सुरळीत होतो. त्यामुळे तुम्हाला हलके वाटते.

ज्या महिलांना पिरीएड्सदरम्यान जास्त त्रास होतो. त्यांनी काळात व्यायाम करायला हवा.

या काळात शरीर सक्रिय ठेवणे खूप महत्वाचे आहे, ज्यात तुम्ही वेगवान चालण्यासह कोणत्याही प्रकारची क्रिया करू शकता.

पिरीएड्समध्ये तुम्ही किमान 30 ते 40 मिनिटे व्यायाम करणे गरजेचे आहे.

पाय आणि छाती यांच्यामध्ये 90 अंशाचा कोन होईल, असे व्यायाम करणे टाळा.

पिरीएड्समध्ये मूड खराब होतो. चीडचीड होते, अशावेळी व्यायाम केल्याने मन स्थिर होते. वेदना कमी होतात, ज्याने मूड ठीकठाक राहतो.

पिरीएड्समध्ये स्ट्रेचिंग एक्ससारसाईझवर अधिक लक्ष केंद्रित करा.

एक लक्षात घ्या, पिरीएड्सदरम्यान व्यायाम करणे फायदेशीर आहे, पण जास्त हेवी व्यायाम या दिवसात करू नये. केवळ हलक्या फुलक्या व्यायामालाच प्राधान्य द्यावे.

 

 

 


हेही वाचा : अनियमित पिरीएड्सची कारणे

 

- Advertisment -

Manini