Sunday, February 25, 2024
घरमानिनीHealthगर्भधारणेचे नियोजन करताना डॉक्टरांकडून जाणून घ्या 'या' महत्त्वाच्या गोष्टी

गर्भधारणेचे नियोजन करताना डॉक्टरांकडून जाणून घ्या ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी

Subscribe

आई होण्यापासून ते नऊ महिने बाळ पोटात असे पर्यंतचा प्रवास हा खूप खडतर असतो. यावेळी अनेक बदल हे आईच्या शरीरात होत असतात. अशावेळी योग्य काळजी आणि योग्य आहार घेणे अतिशय गरजेचे आहे. तसेच आजकाल बहुतेक जोडपी या नियोजनाचे महत्त्व समजून घेऊनच कुटुंबाला पुढे घेऊन जाण्याचा विचार करतात.

यासोबतच आपल्या आर्थिक, सामाजिक आणि मानसिक स्थितीचा अचूक हिशोब करूनच कुटुंबाला पुढे नेण्याचा विचार ते करत असतात. पण या कुटुंब नियोजनात अनेक वेळा भविष्यातील आणि आईच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केले जाते. आणि यामुळे कधीकधी याचे अतिशय वेदनादायक परिणाम दिसू शकतात. पण जर का तुम्ही गर्भधारणेचे नियोजन करण्याचा विचार करत असाल तर काही महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही डॉक्टरांकडून समजून किंवा त्यांचा सल्ला घेऊनच करायला हव्यात. कोणत्या आहेत त्या गोष्टी जाणून घेऊया…

- Advertisement -

10 Strategies to Get Pregnant Fast: A Functional Medicine Approach to  Infertility | Get Pregnant Fast

शरीराच्या खालच्या भागाला बळकट करा

गर्भधारणेदरम्यान, आपल्या शरीराच्या खालच्या भागाच्या स्नायूंवरचा भार हा वाढत्या वेळेनुसार वाढत जातो. त्यामुळे, कंबरेखालील स्नायूंना बळकट करण्यासाठी तुम्ही स्क्वॅट, ब्रिज आणि डेडलिफ्ट यासारखे व्यायाम दररोज करू शकता. यामुळे या भागांचे स्नायू मजबूत राहतात. तसेच शरीराचा खालचा भाग बळकट राहतो.

- Advertisement -

गर्भधारणेत वजन वाढताना अशी घ्या काळजी

गर्भधारणेच्या वेळी बहुतेक महिलांचे वजन वाढते. अशावेळी पाठ आणि पायांवर वजन येते. यामुळे कंबरेखालील स्नायूंना बळकट करण्यासाठी साइड प्लँक किंवा फक्त प्लँक करा. तसेच या व्यायामाने पोटाची लवचिकता वाढेल आणि शरीराच्या कोणत्याही भागावर याचे वजन येणार नाही.

ओटीपोटाला मजबूत करा

ओटीपोट हे गर्भाशयात वाढणाऱ्या बाळासाठी जागा तयार करण्यासाठी मोठे होत असते. त्यामुळे त्याचा ताण वाढतो आणि स्नायू देखील कमकुवत होतात. तसेच या कमकुवतपणामुळे अकाली प्रसूती देखील होऊ शकते. अशावेळी गर्भधारणेपूर्वीच तुम्ही तुमच्या स्नायूंना बळकट करा. जेणेकरून ओटीपोटावर कोणत्याही प्रकारचा ताण येणार नाही.

सूर्यनमस्कार करा

गर्भधारणेचे नियोजन करताना दररोज सूर्यनमस्काराचा सराव केल्याने तुमच्या संपूर्ण शरीरात लवचिकता येईल. सुरुवातीला तीन-चार चक्रांनी सूर्यनमस्कार करायला सुरुवात करा आणि मग वेळेनुसार ते वाढवा. हे करत असताना शरीर एकाच वेळी पुढे आणि मागे वाकले जाते. ज्यामुळे शरीरात लवचिकता येते. यामुळे शरीराच्या विविध भागांमध्ये रक्ताभिसरण वाढून त्यांची कार्यक्षमता वाढते. आणि हे केल्यामुळे नक्कीच गर्भधारणेची शक्यता देखील वाढते.

ध्यानधारणा करा

आपल्या प्रत्येकाच्या जीवनात तणाव खूप वाढला आहे. पण गर्भधारणा आणि गर्भधारणेदरम्यान तणावामुळे नुकसान होऊ शकते. तसेच हा तणाव टाळण्यासाठी ध्यानधारणा करणे हे खूप प्रभावी मानले जाते. आजकाल योगगुरू नेहमी सांगतात की प्रत्येक व्यक्तीने दररोज किमान पाच मिनिटे ध्यान हे केलेच पाहिजे. रात्री झोपण्यापूर्वी भिंतीजवळ बसा. डोळे बंद करा आणि पूर्णपणे लक्ष केंद्रित करा. हे करत असताना ओमचा जप करा आणि एकाग्रता वाढवा. यामुळे चांगली झोप लागेल आणि अस्वस्थता वाटणार नाही तसेच ताण देखील कमी होईल.

________________________________________________________________________

हेही वाचा : मुलांची उंची वाढवण्यासाठी करा हे उपाय

- Advertisment -

Manini