उन्हाळयात कैरीपासून अनेक पदार्थ बनवतात. कैरी खाल्यामुळे शरीराला थंडावा मिळतो. यासोबत शरीराची पचन क्रिया देखील सुधारते. आज आम्ही तुम्हाला कैरीचा ठेचा कसा बनवायचा हे सांगणार आहोत.
साहित्य :
- 1 कैरी
- 4 लसणाच्या पाकळ्या
- 2 हिरव्या मिरच्या
- चवीनुसार मीठ
कृती :
- सर्वप्रथम कैरीचा ठेचा तयार करण्यासाठी हिरव्या मिरच्या, कोथिंबीर कापून घ्या.
- यानंतर आता त्यात कैरी सोलून त्याचे तुकडे करावे.
- आता एका जाड भांड्यात मिरची आणि लसूण वाटून घ्या आणि त्यात कैरीचे तुकडे टाका.
- त्यावर मीठ घालून हे सर्व मिश्रण चांगले ठेचा.
- तयार चटपटीत कैरीचा ठेचा भाकरीसोबत सर्व्ह करा.