Saturday, May 18, 2024
घरमानिनीउन्हाळ्यात फ्रिजचे पाणी पिताय ? जाणून घ्या दुष्परिणाम

उन्हाळ्यात फ्रिजचे पाणी पिताय ? जाणून घ्या दुष्परिणाम

Subscribe

उन्हाळा सुरु झाला असून उष्णतेची झळ जाणवू लागली आहे. त्यामुळे प्रत्येकाला कडक उन्हाळ्यात काही तरी थंड खाण्यापिण्याची इच्छा होत आहे. आपण कुठूनही बाहेरून आलो की पहिली धाव ही फ्रिजकडेच घेतो. तहान भागविण्यासाठी आपण फ्रिजमधील थंडगार पाणी पितो. पण, फ्रिजमधील थंडगार पाणी आरोग्यासाठी घातक ठरू शकते. उन्हाळ्यात जास्त पाणी प्यावे. पण, ते पाणी कसे आणि कशाप्रकारे पीत आहोत याची खबरदारी घेणेही तितकंच महत्वाचे आहे.

आपण अनेकदा फ्रिजमधून पाण्याची बाटली काढून ती तशीच तोंडाला लावतो, पण हे आरोग्यासाठी हानिकारक असून याचे अनेक गंभीर परिणाम होतात.

- Advertisement -

थंड पाणी पिण्याचे दुष्परिणाम (Side Effects Of Cold Water)

उन्हाळ्यात थंड पाणी प्यायल्याने शरीराच्या पचनशक्तीवर परिणाम होतो. ज्यामुळे अन्न पचत नाही. परिणामी, ऍसिडिटी, बद्धकोष्ठता यासारखे आजार बळावतात.

उन्हाळ्यात रोज थंड पाणी प्यायल्याने सांधेदुखी उदभवते. ही समस्या प्रामुख्याने वृद्धांमध्ये दिसून येते.

- Advertisement -

थंड पाणी पिल्याने नाकातील शेलष्मा अधिक कडक होतो. ज्याने श्वसनाचा त्रास जाणवू लागतो.

उन्हाळ्यात थंड पाण्यामुळे घसा खवखवणे, खोकला, घशात सूज येऊ शकते.

थंड पाण्याने वजनही वाढते. खरं तर, प्रत्यक्षात थंड पाणी शरीरात असलेले फॅट्स बर्न करू शकत नाही. ज्यामुळे वजन वाढू लागते.

थंड पाण्याच्या सेवनाने हृदयाच्या ठोक्यांचा वेग मंदावतो.

उन्हातून आल्यानंतर लगेच थंड पाणी किंवा बर्फाचे पाणी प्यायल्याने मणक्याचा त्रास होण्याची शक्यता निर्माण होते.

थंड पाण्यामुळे डोकेदुखी जाणवू लागते.

थंड पाण्यामुळे शरीराची मेटाबॉलिक सिस्टीम मंदावते. ज्याने अशक्तपणा आणि थकवा जाणवतो.

 

 


हेही पहा : stomach inflammation : पोटातील जळजळ थांबविण्यासाठी खा हे पदार्थ

 

Edited By – Chaitali Shinde

- Advertisment -

Manini