Sunday, May 5, 2024
घरमानिनीFood storage Tips: फ्रिजमध्ये ठेवेलेले अन्न, भाज्या खराब होतात का ? तर...

Food storage Tips: फ्रिजमध्ये ठेवेलेले अन्न, भाज्या खराब होतात का ? तर मग वापरा ‘या’ टिप्स

Subscribe

अन्नाचा दर्जा योग्य राखण्यासाठी अन्न साठवणुकीच्या जागेचे तापमान योग्य असावे. तसेच तुमचा रेफ्रिजरेटर 40 डिग्री फॅरेनहाइट किंवा त्याहून कमी ठेवा. जेणेकरून कोणत्याही प्रकारचे अन्न खराब होणार नाही.

फ्रीजमधील आतील तापमान सर्व ठिकाणी समान असणे आवश्यक आहे. तसेच पदार्थ त्यांच्या तापमाना नुसार ते त्या त्या ठिकाणी ठेवणे आवश्यक आहे. यामुळे त्याचा ताजेपणा कायम राहतो. ताजी फळे आणि भाजीपाला हे नेहमी फ्रिज खाली असलेल्या वेगळ्या स्टोअर कप्या मध्ये ठेवावे. कारण या ठिकाणी तापमान नियंत्रित राहते. डेअरी प्रॉडक्ट जास्त थंड ठेवणे आवश्यक असते. त्यामुळे हे पदार्थ फ्रिजमध्ये वरती असलेल्या कप्प्यामध्ये ठेवणे आवश्यक आहे.

अन्नाचा दर्जा योग्य राखण्यासाठी अन्न साठवणुकीच्या जागेचे तापमान योग्य असावे. तसेच तुमचा रेफ्रिजरेटर 40 डिग्री फॅरेनहाइट किंवा त्याहून कमी ठेवा. जेणेकरून कोणत्याही प्रकारचे अन्न खराब होणार नाही आणि दिर्घकाळ टिकून राहील.

- Advertisement -

Storing food in the freezer | safefood

  •  एअर टाईट प्लास्टिक बॅग पदार्थ स्टोरेज करण्यासाठी वापरू नये. कारण फळ आणि भाजीपाला साठी खुल्या हवेची गरज असते
  •  भाजीपाला आणि फळे एका ठिकाणी ठेवू नये. काही फळे व भाजीपाला हे येथिलीन उत्सर्जित करत असतात. त्यामुळे त्याचा उग्र वास येत असतो.
  •  मुळा फ्रिजमध्ये ठेवण्याच्या पूर्वी त्याची पाने बाजूला करावीत, गाजर फ्रीजमध्ये ठेवताना त्याचा वरील भाग कापून टाकावा.
  • स्ट्रॉबेरी आणि अंजीर सारखे असणारे पदार्थ पसरून ठेवावेत. एकावर एक फळ ठेवल्यास ते खराब होऊ शकतात.
  • मशरूमला ताजे ठेवण्यासाठी पेपर बॅग चा वापर करावा.
  •  फ्रीजमध्ये उघडे अन्नपदार्थ ठेऊ नये. यामुळे बाकी पदार्थाला त्याचा वास येतो आणि ते खराब होऊ शकते.
  •  काकडी आणि बीन्स सारखे पदार्थ हलक्या कापडामध्ये गुंडाळून फ्रिजमध्ये ठेवावे.

5,500+ Freezer Storage Stock Photos, Pictures & Royalty-Free Images -  iStock | Home freezer storage, Freezer storage warehouse, Freezer storage  kitchen

- Advertisement -

फ्रिजमध्ये अन्न साठवताना ‘हि’ घ्या काळजी-

  • फ्रीजचे तापमान नियंत्रित ठेवा.
  • भाजीपाला थेट कप्यात ठेवण्या ऐवजी टिशू पेपर अथवा नॅपकीनवर पसरून ठेवावे.
  • यामुळे अतिरिक्त तापमानामुळे ते व्यवस्थित राहतील.
  • तसेच यातील भाजीपाला वेळोवेळी वर खाली करत रहावे.

हेही वाचा :

Kitchen Food Tips : ऑम्लेट पॅनला चिकटतयं, मग वापरा ‘या’ टिप्स

- Advertisment -

Manini