Wednesday, February 28, 2024
घरमानिनीKitchenKitchen Tips : 10 सोप्या टिप्स

Kitchen Tips : 10 सोप्या टिप्स

Subscribe

अनेकदा जेवण करताना गृहिणींना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. अशावेळी खास किचन टिप्स लक्षात असल्यास त्याचा चांगलाच फायदा होतो.

What is Cooking Therapy? | The Table by Harry & David

- Advertisement -
  • साखरेचा पाक केल्यानंतर साखरेचे परत कण बनू नयेत म्हणून पाकात थोडे लिंबू पिळावे.
  • भजी,पकोडे चुरचुरीत हवे असतील तर बेसन पीठ भिजावताना त्यात थोडेसे मक्याचे पीठ घालावे.
  • शेंगदाणे भाजण्यापूर्वी दाण्याला पाण्याचा हात लावून मग भाजावेत. दाणे खमंग भाजून होतात.
  • भरीतासाठी वांगी चांगली भाजली जावी म्हणून त्याला थोडा गोडेतेलाचा हात किंवा सुरीने छोटी चिर पाडली तर भाजताना तयार होणारी वाफ पडेल. भाजल्यानंतर वांगी लगेच पातेल्याखाली झाकून ठेवल्यास साल नीट सुटतात.
  • पालेभाज्या शिळ्या सुकलेल्या असल्यास पाण्यात 1 चमचा व्हिनेगर किंवा लिंबाचा रस घालून ठेवल्या तर ताज्या होतात.

  • शेंगदाणे भाजून झाल्यावर त्यात 2 चिमूट मीठ टाकावे आणि गॅस बंद करून थोडे परतावे. त्यामुळे साली लवकर सुटतात.
  • खीर करण्यासाठी दूध आटवताना त्यात जायफळ अजिबात घालू नये. त्याने दूध फाटते.
  • पुदीना वाळवून त्याची पूड करून ठेवल्यास दही वड्यात, पाणी-पुरीचे पाणी करताना उपयोगी पडतो.
  • एरंडेल तेलात हळद घालून गरम करावे. गार झाल्यावर तूर हरभरा डाळीना चोळल्यास डाळी पिवळ्या दिसतात. नंतर उन्ह द्यावे.
  • पावसाळयात मिठाला पाणी सुटते. भरणीवर कागद ठेवून झाकण घट्ट लावावे.

हेही वाचा :

Kitchen Tips : महिलांसाठी 10 स्पेशल मानिनी टीप्स

- Advertisment -

Manini