केळ खाणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. परंतु केळ खरेदी केल्यानंतर आपण ते काही दिवस कधीकधी खात सुद्धा नाही. यामुळे ते खराब होते. खरंतर केळ अन्य फळांच्या तुलनेत लवकर पिकले जाते आणि ते काळं पडते. त्याचसोबत ते फ्रिजमध्ये स्टोर करण्याचा सल्ला सुद्धा दिला जात नाही. अशातच रेफ्रिजरेटरशिवाय ते फ्रेश कसे ठेवावे याच बद्दलच्या काही ट्रिक्स जाणून घेऊयात.
-प्लास्टिक किंवा सेलोटेपचा वापर
केळ खुप दिवस टिकावे म्हणून त्याच्या देठावर प्लास्टिक किंवा सेलेटेपचा वापर करावा. जेणेकरुन ते फ्रेश राहिल.
-बनाना हँगरचा वापर करा
केळ खराब होऊ नये म्हणून मार्केटमध्ये विविध प्रकारचे हँगर येतात. अशातच केळी त्या हँगरला तुम्ही लावून ठेवू शकता. असे केल्याने ते दीर्घकाळ टिकू शकतात.
-व्हिटॅमिन सी टॅबलेटची मदत घ्या
केळ खुप दिवस टिकावे म्हणून व्हिटॅमिन सी च्या टॅबलेट तुम्ही वापरू शकता. व्हिटॅमिन सी ची टॅबलेट एका ग्लासातील पाण्यात टाकून ती त्यात मिक्स करून घ्या. त्यात आता केळ बुडवून ठेवा.
-वॅक्स पेपरमध्ये गुंडाळा
केळ खुप दिवस टिकावे म्हणून तुम्ही ते वॅक्स पेपरमध्ये गुंडाळून ठेवू शकता. त्यामुळे ते लवकर खराब होत नाही.
हेही वाचा- Kitchen Tips : जेवण बनवताना वापरा ‘या’ हटके टिप्स