घरमहाराष्ट्रकुणाला जर यायचे असले तर तो व्हिडीओ टाकून येतो का? 'त्या' प्रकरणावर फडणवीस थेटच बोलले

कुणाला जर यायचे असले तर तो व्हिडीओ टाकून येतो का? ‘त्या’ प्रकरणावर फडणवीस थेटच बोलले

Subscribe

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा 'मी पुन्हा येईन' ही कविता आणि त्यानंतर निवडणुकीतली घोषणा चांगलीच गाजली होती. त्यानंतर गुरुवारी भाजपा महाराष्ट्र या X हँडलने त्यांची ही कविता पोस्ट केली होती.

मुंबई : देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेच्या पाठीशी आहे आणि त्यांच्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार, एकनाथ शिंदे हे आमचे मुख्यमंत्री आहेत. आणि त्यांच्या नेतृत्वात या महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी मी त्यांच्या पाठीशी पूर्ण ताकदीने उभा आहे. परंतू मला कधी कधी आश्चर्य वाटते आणि त्याआधीही माझा प्रश्न असा आहे की, कुणाला जर यायचे असले तर तो व्हिडीओ टाकून येतो का? असा प्रश्न विचारत देवेंद्र फडणवीस यांनी त्या व्हिडीओबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. (If anyone wants to come can they post the video Fadnavis spoke directly on that matter)

- Advertisement -

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘मी पुन्हा येईन’ ही कविता आणि त्यानंतर निवडणुकीतली घोषणा चांगलीच गाजली होती. त्यानंतर गुरुवारी भाजपा महाराष्ट्र या X हँडलने त्यांची ही कविता पोस्ट केली होती. तसंच मी पुन्हा येईन नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी असं कॅप्शनही लिहिलं होतं. ज्यावरुन चर्चा सुरु झाल्या आणि भाजपाने अवघ्या एक तासात ही पोस्ट डिलिट केली. त्यानंतर आता स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी आज शुक्रवारी (28 ऑक्टोबर) माध्यमांशी संवाद साधत या प्रकरणावर भाष्य केले. यावेळी ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाबाबतही भूमिका विषद केली.

 

- Advertisement -

हेही वाचा : शरद पवार थेटच बोलले; मोदींचे आरोप वास्तवाला धरून नाही, निवडणुकीचा धसका घेतल्यामुळे ‘असे’ बोलत असतील

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांची कार्यकाळ पूर्ण करतील

यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, व्हिडीओ व्हायरल करणे हा किती वेडेपणा आहे हा, डोकं तर ठिकाणावर असलं पाहीजे. परंतू मी पुन्हा एकदा सांगतो की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांचा कार्यकाळ पूर्ण करतील. एकही दिवस कमी नाही पूर्ण कार्यकाळ. आणि ते मुख्यमंत्री असताना त्यांच्याच नेतृत्वात महाराष्ट्रात निवडणुका होतील. आम्ही सगळेजण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. एखादा व्हिडीओ असा पडला आणि तसा पडला याचं इंटरप्रिटेशन करण हे चुकीचं आहे. असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्याबाबत भाष्य केले.

हेही वाचा : मुंबईकरांनो काळजी घ्या, मुंबई बनले देशातील सर्वाधिक प्रदूषित शहर; दिल्लीलाही टाकलं मागे

ज्यांच्या नेतृत्वात चार खासदार निवडून येतात…

यावेळी माध्यम प्रतिनिधींनी शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत केलेल्या आरोपाप्रकरणी देवेंद्र फडणीवस यांना विचारले असता ते म्हणाले की, ज्यांच्या नेतृत्वाखाली 305 खासदार निवडून येतात आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली चार खासदार निवडून येतात त्यांचा धसका घेतला असं बोलणं हास्यास्पद आहे. परंतू पवार काय बोलले हे आधी पाहणार आणि नंतरच त्याच्यावर भाष्य करणार असल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -