Monday, April 15, 2024
घरमानिनीKitchenRecipe : झटपट बनवा पालक पराठा

Recipe : झटपट बनवा पालक पराठा

Subscribe

बऱ्याचदा सकाळी ऑफिसला जाताना नाश्ता काय करावा असा प्रश्न पडतो. अशावेळी पौष्टिकपालक पराठा नक्की ट्राय करु शकता.

साहित्य :

 • 2 जुडी पालक
 • 10 पाकळ्या लसूण
 • 1 चमचा किसलेलं आलं
 • 1 चमचा धण्या जिऱ्याची पुड
 • 1/4 चमचा हळद
 • मीठ चवीनुसार
 • 1/2 चमचा तिखट
 • दीड वाटी गव्हाचे पीठ
 • 1/2 वाटी बेसनाचे पीठ
 • पाणी
 • तेल

कृती :

 • पालक धुवून बारीक चिरा. त्यानंतर लसूण आणि आलं मिक्सरमध्ये बारीक करुन घ्या.
 • गव्हाचे पीठ आणि बेसनाचे पीठ व्यवस्थित एकत्र करुन घ्या आणि त्यात तिखट, मीठ, हळद, धण्याजिऱ्याची पूड, लसूण आल्याची पेस्ट आणि शेवटी चिरलेला पालक घाला.
 • आता हे सर्व थोडे पाणी घालून मळून घ्या.
 • आता थोडे तेल घालून कणकेचा गोळा करुन ठेवा आणि याचे पराठे बनवा.
 • हे पराठे सॉससोबत सर्व्ह करा.

हेही वाचा : 

Recipe : मुलांसाठी बनवा टेस्टी हेल्दी गाजराचे पराठे

- Advertisment -

Manini