Monday, April 15, 2024
घरमानिनीKitchenCorn Bhaji : मक्याची चटपटीत भजी

Corn Bhaji : मक्याची चटपटीत भजी

Subscribe

आपण अनेकदा मसाला मका, चीज कॉर्न अशा मक्याच्या वेगवेगळ्या रेसिपी ट्राय करतो. आज आम्ही तुम्हाला मक्याची भजी कशी बनवायची हे सांगणार आहोत.

साहित्य :

 • 300 ग्रॅम मक्याचे दाणे
 • दीड कप बेसन
 • 1 शिमला मिरची
 • 1 कांदा बारीक चिरलेला
 • 1 चमचा आलं-हिरव्या मिरचीची पेस्ट
 • चिमूटभर हिंग
 • 1 चमचा बडीशेप
 • तेल आणि मीठ

कृती :

Corn Pineapple Pakoda Recipe - My Healthy Breakfast

- Advertisement -
 • सर्वप्रथम मके वाफवून घ्या. त्यानंतर ते मिक्सरमध्ये वाटून घ्या.
 • आता त्यात बेसन, चिरलेल्या भाज्या, आले-मिरची पेस्ट, हींग, बडी शेप आणि चवीनुसार मीठ टाकून मिश्रण तयार करावे.
 • त्यानंतर कढईत तेल गरम करा आणि केलेल्या मिश्रणाची भजी तेलात टाकून तळून घ्या.
 • लालसर होईपर्यंत भजी तळून घ्या.
 • प्लेटमध्ये गरमागरम भजी काढून सॉस किंवा चटणीसोबत सर्व्ह करा.

हेही वाचा :

Chutney : हेल्दी अ‍ॅण्ड टेस्टी पेरूची चटणी

- Advertisment -

Manini