Monday, April 29, 2024
घरमानिनीKitchenChow Mein Noodles : झटपट बनवा चटपटीत चाऊमीन नूडल्स

Chow Mein Noodles : झटपट बनवा चटपटीत चाऊमीन नूडल्स

Subscribe

बाजारातील चाऊमीन नूडल्स आपण नेहमीच खातो. पण आज आम्ही तुम्हाला घरच्या घरी झटपट चटपटीत चाऊमीन नूडल्स कसे बनवायचे हे सांगणार आहोत.

साहित्य :

  • 150 ग्रॅम चाऊमीन नूडल्स
  • 1 कप कांदा (चिरलेला)
  • 1 कप कोबी (चिरलेला)
  • 1 कप शिमला मिरची (चिरलेली)
  • लसूण (चिरलेला)
  • 2 चमचे सोया सॉस
  • 1/2 चमचा टोमॅटो सॉस
  • 1/2 ग्रीन चिली सॉस
  • 1 चमचा हिरवी मिरची
  • 1/2 चमचा साखर
  • काळी मिरची पावडर
  • मीठ चवीनुसार
  • तेल आवश्यकतेनुसार

कृती :

Chow Mein Noodles – Curated Kitchenware

  • सर्वप्रथम मध्यम आचेवर एका भांड्यामध्ये पाणी, मीठ आणि 2 चमचे तेल टाकून चाऊमीन नूडल्स उकळून घ्या.
  • आता दुसरीकडे मध्यम आचेवर एका भांड्यामध्ये तेल टाकून ते गरम करून घ्या.
  • आता यामध्ये लसूण, कांदा, शिमला मिरची शिजवून घ्या.
  • कांदा शिजल्यानंतर यामध्ये सोया सॉस, टोमॅटो सॉस, ग्रीन चिली सॉस मिक्स करा.
  • आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून त्यात चाऊमीन नूडल्स मिक्स करून परतून घ्या.
  • 5-10 मिनिट भांड्यावर झाकण ठेवून चाऊमीन नूडल्स शिजवून घ्या.
  • तयार चाऊमीन नूडल्स सर्व्ह करा.

हेही वाचा : Poha Dosa : नाश्त्यासाठी पोह्याचे हेल्दी डोसे

- Advertisment -

Manini