सकाळच्या नाश्त्याला आपण नेहमीच पोहे, शिरा, शेवया खातो. पण सतत तेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो. अशा वेळी तुम्ही पौष्टिक ओट्स पराठा ट्राय करू शकता.
साहित्य :
- 1 वाटी ओट्स
- 1 वाटी बेसन पीठ
- कांदा
- मिरची
- टोमॅटो
- कोथिंबीर
- मीठ (चवीनुसार)
- Advertisement -
कृती :
- सर्वप्रथम ओट्स 5-10 मिनिटांसाठी पाण्यात भिजत ठेवा.
- त्यानंतर एका भांड्यात भिजवलेले ओट्स, बेसन पीठ, कांदा, मिरची, टोमॅटो, मीठ मिक्स करा.
- सर्व मिश्रण 4-5 मिनिट व्यवस्थित फेटून घ्या.
- आता गॅसवर पॅन गरम करण्यासाठी ठेवा.
- गरम पॅनध्ये थोडं तेल टाकून त्यावर ओट्सचे मिश्रण व्यवस्थित पसरवून घ्या.
- एका बाजूने 4-5 मिनिट भाजल्यानंतर पराठा दुसऱ्या बाजूने भाजून घ्या.
- दुसऱ्या बाजूने देखील खरपूस भाजल्यानंतर गरमा-गरम ओट्स सर्व्ह करा.
- Advertisement -
हेही वाचा :