सकाळच्या नाश्त्याला आपण नेहमीच पोहे, शिरा, शेवया खातो. पण सतत तेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो. अशा वेळी तुम्ही पौष्टिक ओट्स उपमा नक्की ट्राय करू शकता.
साहित्य :
- 1 वाटी ओट्स
- कांदा
- मिरची
- कढीपत्ता
- कोथिंबीर
- जिरं
- मोहरी
कृती :
- सर्वप्रथम गॅसवर कढई गरम करायला ठेवा. गरम कढईत ओट्स भाजून घ्या.
- 5-10 मिनिट ओट्स भाजल्यानंतर ते एका भांड्यात काढा.
- आता कढईत तेल घालून त्यात जिरे, मोहरी, कांदा, मिरच्या आणि कढीपत्ता परतून घ्या.
- आता त्यात भाजलेले ओट्स घाला.
- ओट्स छान परतल्यावर त्यात पाणी मिक्स करा.
- आता त्यात चवीनुसार मीठ घाला.
- ओट्स परतून घ्या.
- आता 5-10 मिनिटांसाठी ओट्सवर ताट झाकूण ठेवा.
- झाकलेले ताट काढून ओट्स पुन्हा परतून घ्या आणि सर्व्ह करा.
- Advertisement -
हेही वाचा :
Recipe: झटपट होणारी पोह्यांची भेळ
- Advertisement -
- Advertisement -