Wednesday, May 15, 2024
घरमानिनीHealth'या' पदार्थांचे सेवन केल्याने चेहऱ्यावर येतात पिंपल्स

‘या’ पदार्थांचे सेवन केल्याने चेहऱ्यावर येतात पिंपल्स

Subscribe

अनेक तरुणींना पिंपल्सच्या समस्येला सतत समोरे जावे लागते. पिंपल्स कमी करण्यासाठी अनेक महागड्या औषधांचे सेवन केले जाते. महागड्या क्रिम वापरल्या जातात. पण खरंतर चेहऱ्यावर पिंपल्स येण्यामागे आपल्या रोजच्या खाण्यापिण्याची सवयही कारणीभूत आहेत. आपल्या रोजच्या खाण्यातल्या काही पदार्थांमुळे देखील आपल्या चेहऱ्यावर पिंपल्स येतात.

‘या’ पदार्थांचे करू नका सेवन

  • चहा, कॉफीचे सेवन

Special Tea – Mostell Restaurant Ltd

- Advertisement -

चहा,कॉफीचे अतिसेवन केल्याने चेहऱ्यावर पिंपल्स येण्याचे कारण बनते. कॉफीमध्ये असणाऱ्या कॅफीनमुळे इंशुलिनचे प्रमाण वाढवते त्यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स येतात.

  • मैद्याचे पदार्थ

Premium Photo | Indian khari or kharee. indian famous puff pastry snack,  eat with hot tea or coffee

- Advertisement -

रोजच्या खाण्यात जर मैद्याच्या पदार्थांचा जास्त समावेश असेल तर त्यांनेही चेहऱ्यावर पिंपल्स यायला सुरूवात होते. मैद्यापासून तयार झालेली बिस्किट,ब्रेड, समोसा, खारी हे पदार्थ खाणे टाळा. मैद्यामुळे पोट साफ होण्यास अडचण येते. त्यामुळे त्याचे दुष्परिणाम म्हणून चेहऱ्यावर पिंपल्स येतात.

  • जंक फुड

8 Diet Tips for Preventing Acne

 

सतत जंक फुडचे सेवन हे चेहऱ्यावर पिंपल्स येण्याचे महत्त्वाचे कारण आहे. तेलकट पदार्थ खाल्ल्याने चेहऱ्यावर मोठ्या प्रमाणात पिंपल्स येतात. अनावश्यक तेल शरीरात गेल्याने त्याचे दुष्परिणाम चेहऱ्यावर पिंपल्स स्वरूपात होतात.

  • औषधांचे सेवन

How to save money on medicine | CHOICE

जास्त प्रमाणाच औषधांचे सेवन करत असाल तर त्यानेही चेहऱ्यावर पिंपल्स येतात. औषधांच्या सेवनाने शरीरातील हार्मोन्स असंतुलित होतात. हार्मोन्सच्या असंतुलित असण्याने चेहऱ्यावर पिंपल्स येतात. त्यामुळे जास्त प्रमाणात औषधांचे सेवन करणे टाळा.

 


हेही वाचा :

‘या’ समस्या असणाऱ्यांनी पिऊ नये हळदीचे दूध

- Advertisment -

Manini