घररायगडआ.महेंद्र थोरवेंच्या प्रयत्नाने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयाचे नुतनीकरण

आ.महेंद्र थोरवेंच्या प्रयत्नाने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयाचे नुतनीकरण

Subscribe

खोपोली नगरपरिषदेच्या रूग्णालयासाठी ३ कोटीचा निधी उपलब्ध करता आला याबद्दल मला मनस्वी आनंद होत असल्याचे आमदार महेंद्र थोरवे यांनी सांगत कोविड रूग्णालयाच्या इमारती अभावी मोठी ाडचण झाली. भविष्यात अशी आपत्ती आल्यास सुसज्ज रूग्णालय असावे यासाठी दोन मजली इमारत बांधली जाणार आहे. यामध्ये ४० बेड असणार आहेत. रुग्णालयात अद्यावत साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी मोठी निधी उपलब्ध करून देणार असल्याचेही आ.थोरवे म्हणाले.

खोपोली-:  खोपोली नगरपरिषदेच्या भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयाची इमारत जीर्ण झाल्यामुळे कोविड काळात रूग्णावर उपचार करण्यासाठी के.एम.सी.कॉलेजची इमारतीचा आधार नगरपालिकेला घ्यावा लागला होता. ही गंभीर समस्या लक्षात घेत अद्यावत रुग्णालय बांधण्यासाठी कर्जत-खालापूर मतदार संघाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी राज्य शासनाकडे या रुग्णालचे नव्याने बांधकाम करण्यासाठी पाठपुरावा केला होता. आमदार थोरवे यांच्या प्रयत्नाने वैशिष्टयपुर्ण योजनेतून तीन कोटींचा निधी मिळाला आहे. (Karjat-Khalapur Constituency MLA Mahendra Thorve pursued the state government to build this hospital a new) 

आमदार थोरवे यांच्या शुभ हस्ते कामाचा भूमिपूजन करण्यात आले. दोन मजली अद्यावत इमारत बांधताना निधी कमी पडल्यास अजून निधी उपलब्ध करून देत खोपोलीकरांची प्रश्न मार्गी लावणार असल्याचे आश्वासन आ.थोरवे यांनी दिले आहे.

- Advertisement -

भूमिपूजन समारंभासाठी माजी नगराध्यक्ष दत्ताजीराव मसुरकर, सुमन औसरमल, मुख्याधिकारी पंकज पाटील, माजी उपनगराध्यक्ष राजू गायकवाड, जेष्ठ नगरसेवक मोहन औसरमल, शिवसेना शहर प्रमुख संदीप पाटील, संपर्क प्रमुख हरीश काळे, स्थानिक माजी नगरसेविक समीर मसुरकर, नगरसेविका केविना गायकवाड, जिनी सॅम्युयल, माजी नगरसेवक अमोल जाधव, नगरपालिकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. संगीता वानखेडे, आरपीआय पक्षाचे युवक जिल्हाध्यक्ष प्रमोद महाडिक, सेनेचे पंकज पाटील अन्य पदाधिकारी आणि शहरातील नागरिक उपस्थित होते.

कोविड काळात रूग्णालयात बेडसाठी जागा नसल्यामुळे खोपोलीकरांची झालेली हेळसांड लक्षात घेता सुसज्ज इमारत बांधण्यासाठी आमदार थोरवे यांच्याकडे मागणी केली असता आमदार थोरवे यांनी पाठपुरावा केल्याबद्दल माजी नगराध्यक्ष दत्ताजीराव मसुरकर यांनी आभार मानले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -