घरमहाराष्ट्रPolitical News: अशोक चव्हाण काँग्रेस सोडणार हे 'त्या' घटनेवरुन समजलं होतं; जाणून...

Political News: अशोक चव्हाण काँग्रेस सोडणार हे ‘त्या’ घटनेवरुन समजलं होतं; जाणून घ्या, त्या दिवशी नेमकं काय घडलं?

Subscribe

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत, राज्यातील राजकारणात मोठा स्फोट घडवून आणला. मात्र, या स्फोटाची चुणूक 2022 ला झालेल्या बहुमत चाचणीच्यावेळीच लागली होती.

मुंबई: माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत, राज्यातील राजकारणात मोठा स्फोट घडवून आणला. मात्र, या स्फोटाची चुणूक 2022 ला झालेल्या बहुमत चाचणीच्यावेळीच लागली होती.  शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाकरे सरकार कोसळले. त्यावेळी मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदे झाले. त्यानंतर जी बहुमत चाचणी झाली, त्यावेळी अशोक चव्हाण हे सभागृहात उशिरा पोहचले होते आणि त्यामुळे त्यांना मतदान करता आले नाही. खरं तर त्याचवेळी त्यांनी भाजपाची अप्रत्यक्षरित्या मदत केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता आणि तेव्हाच अशोक चव्हाण हे काँग्रेस सोडून भाजपात जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. (Political News It was understood that Ashok Chavan would leave Congress only after that incident Know what really happened that day)

त्या दिवशी नेमकं काय घडलं?

2022 मध्ये विश्वासदर्शक ठरावाच्यावेळी अशोक चव्हाण सभागृहात उशिरा पोहोचले होते. त्यामुळे त्यांना मतदान करता आले नव्हते. त्यांच्यासोबत इतर चार ते पाच आमदार बहुमत चाचणीपासून दूर राहिले होते. त्यानंतर आमच्या पाठीशी असणाऱ्या अदृश्य हातांचे आभार, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भर सभागृहात म्हटलं होतं. त्यामुळे ते अदृश्य हात कोणाचे होते, ते बऱ्याच जणांच्या लक्षात आले होते.

- Advertisement -

त्यानंतर काही जणांनी खरोखरोच त्यांना पोहचण्यास उशीर झाला की ते त्यांनी जाणूनबुजून केलं, असा आरोप करत होते. त्यानंतर पक्षाविरोधी कार्यवाही केल्याप्रकरणी काँग्रेसने त्यावेळी अशोक चव्हाण यांना कारणे दाखवा नोटी बजावली होती. तेव्हापासून अशोक चव्हाण पक्षावर नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या.

आमदार संग्राम थोपटेंनी स्पष्ट केली भूमिका

आमदार संग्राम थोपटे म्हणाले की, अशोक चव्हाण आणि अमर राजूकर यांनी कुठल्या कारणामुळे राजीनामा दिला हे माहिती नाही. काँग्रेसचे आमदार, नेते भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत, असं बोललं जात आहे. यावर आत्ताचं भाष्य करणं योग्य ठरणार नाही. येत्या काळात चित्र स्पष्ट होईल, जे नेते पक्ष सोडून इतर पक्षात जात आहेत, ते का जात आहेत, याची कारणं तेच चांगल्याप्रकारे सांगू शकतील, असं थोपटेंनी म्हटलं आहे.

- Advertisement -

थोपटे म्हणाले, मी काँग्रेस सोडून इतर पक्षात जाण्याचा प्रश्नच नाही. माझ्याबद्दल या आधीही अनेक वेळा वृत्तवाहिनी, प्रिंट मीडियाद्वारे वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या आल्या आहेत, त्या त्या वेळेला मी खुलासा केलेला आहे. त्यामुळे इतरत्र जाण्याचा काहीच प्रश्न येत नाही. जे पक्ष सोडून जाणार आहेत अशी चर्चा आहे, त्यांची काय नाराजी आहे हे मी सांगू शकत नाही, असं थोपटे म्हणाले.

(हेही वाचा: Maharashtra Politics : अशोक चव्हाणांचा राजीनामा अन् आठवलेंकडून पुन्हा खुली ऑफर )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -