Tuesday, May 14, 2024
घरमानिनीRelationshipमुलांना वाचनाची सवय लावण्यासाठी 'या' टीप्स येतील कामी

मुलांना वाचनाची सवय लावण्यासाठी ‘या’ टीप्स येतील कामी

Subscribe

बहुतांश पालक असे असतील जे मुलांना वाचनाची सवय आवर्जुन लावतात. खरंतर सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे आणि टेक्नॉलॉजीमुळे मुलांना वाचनाची सवय लावणे फार मुश्किल झाले आहे. मुलं ही सध्या आपला अधिक वेळ पुस्तकात नव्हे तर गेम्स खेळण्यात अधिक घालवतात. अशातच त्यांना पुस्तक वाचण्याचा कंटाळा येतो. त्यामुळे मुलांना वाचनाची सवय लावण्यासाठी पुढील काही टीप्स कामी येतील. (Reading habit in children)

-इलेस्ट्रेशन बुक्स
तुम्ही मुलांना इलेस्ट्रेशन बुक्स वाचण्यासाठी देऊ शकता. यामध्ये फोटो अधिक असतात. त्यामुळे मुलांना वाचनाची आवड त्यामुळे लागू शकते. तसेच मुलांना अशी पुस्तक द्या ज्यामध्ये चित्रांसह मोठ्या अक्षरात ही लिहिलेले असावे.

- Advertisement -
reading habit in children (photo credits-google)
reading habit in children (photo credits-google)

-फॅमिली रिडिंग टाइम
पालकांनी काही वेळ मुलांसोबत बसून वाचले पाहिजे. जेणेकरुन मुलांमध्ये सुद्धा याची आवड निर्माण होईल.कधीकधी पालकांनी सुद्धा मुलांना स्टोरीज वाचून दाखवल्या पाहिजेत किंवा त्यांना त्या वाचण्यासाठी द्याव्यात.

-आवडीची पुस्तक द्या
मुलांना त्यांच्या आवडीची पुस्तक वाचण्यास द्या.यामुळे मुलांना कोणत्या प्रकारची पुस्तक वाचण्यास आवडतायत हे तुम्हाला कळेल. त्याचसोबत मुलांना त्यांना जी पुस्तक आवडतात ती निवडू द्या. यामुळे त्यांच्यामध्ये पुस्तक वाचण्याची आवड निर्माण होईल.

- Advertisement -

-पुस्तकांबद्दल मुलांशी बोला
जर मुलं एखादे पुस्तक वाचत असेल तर ते नक्की कोणते आहे आणि कशा संदर्भात आहे हे सुद्धा त्यांना सांगा. मुलांना थोडंस क्रिएटिव्ह पद्धतीने गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करा.


हेही वाचा- मुलांसाठी खेळणी घेताय, मग ‘या’ टीप्सची होईल मदत

- Advertisment -

Manini