Friday, May 3, 2024
घरमानिनीHealthतुम्हालाही खूप राग येतो? मग त्याची ही आहेत कारणे

तुम्हालाही खूप राग येतो? मग त्याची ही आहेत कारणे

Subscribe

कोणत्याही गोष्टीवर राग येणे एक सामान्य आहे. मनाच्या या भावनात्मक स्थितीतून आपण लगेच बाहेर येतो. तर काही जण यावर अधिक विचार करतात. रागामुळे शरिरात काही साइकॉलोजिकल आणि बायोलॉजिकल बदल सुद्धा होतात. खुप राग येत असल्याने हृदयाचे ठोके आणि ब्लड प्रेशर वाढू लागते. अशातच बैचेन सुद्धा कधीकधी वाटते. यामुळे शरिरात एनर्जी हार्मोन, एड्रेनालाइन आणि नॉरएड्रेनालाईनचा स्तर सुद्धा वाढू शकतो. (Reasons of anger)

व्यक्तीला दोन कारणास्तव राग येऊ शकतो. एक म्हणजे एक्सटर्नल आणि दुसरा इंटरनल इवेंट. एक्सटर्नलचा अर्थ असा आहे की, एखाद्या व्यक्तीच्या बोलण्यावर किंवा स्थितीवर राग व्यक्त करणे. तर इंटरनल इवेंटचा असा अर्थ होतो की, एखादा व्यक्ती आपल्या एखाद्या जुन्या अपयशामुळे किंवा जुन्या गोष्टीचा विचार करुन राग व्यक्त करतो. ती गोष्ट त्याला आतमधून त्रास देत असते.

- Advertisement -

खरंतर राग येणे स्वाभिकच आहे. मात्र काही लोकांना फार राग येतो. त्यामुळे तो त्यांच्यासाठी हानिकारक ही ठरु शकतो. अशा व्यक्तींनी रागावर नियंत्रण ठेवण्यासाठी काही गोष्टी केल्या पाहिजेच. त्यासाठी सर्वात प्रथम तुम्ही तुमच्या रागाचे कारण शोधा. त्यानंतर त्यावर कंट्रोल कसे करायचे याचा विचार करा. तुम्हाला हे कळले पाहिजे की, समस्येचे समाधान हे रागाने होणार नाही. लोकांनी आपल्या परिस्थितीनुसार समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

- Advertisement -

‘या’ कारणांमुळे येतो अतिशय राग
-कामात ढवळाढवळ करणे
-मोठ्याने बोलणे
-वारंवार एखादे काम करताना अडवणे
-भावना समजून न घेणे
-अपशब्दांचा वापर करणे
-मस्करी करणे

खरंतर रागावर नियंत्रण कसे करायचे हे प्रत्येकाला कळले पाहिजे. अन्यथा स्थिती अधिक बिघडू शकते. तुम्ही जेव्हा रागात असता आणि त्याचवेळी समोरच्या व्यक्तीला उत्तर देता तेव्हा स्थिती हाताबाहेर जाऊ शकते. अशातच तुम्ही स्वत: ला नकारत्मकतेपासून दूर ठेवले पाहिजे. सकारात्मक लाइफस्टाइलला फॉलो केले पाहिजे. तर पुढील काही गोष्टी सुद्धा तुम्ही फॉलो करु शकता.

-बोलण्यापूर्वी एकदा विचार करा
-तुमचे विचार लिहा
-काहीवेळ स्वत:साठी द्या
-व्यायाम करणे गरजेचे
-स्वत:ला एखाद्या कामात व्यस्त करा


हेही वाचा- दिवसभर गोंधळलेली अवस्था हा आहे एक प्रकारचा आजार

 

- Advertisment -

Manini