Saturday, April 13, 2024
घरमानिनीKitchenRecipe : टेस्टी मेथीची शंकरपाळी

Recipe : टेस्टी मेथीची शंकरपाळी

Subscribe

आज आम्ही तुम्हाला मेथीची शंकरपाळी कशी बनवायची हे सांगणार आहोत.

साहित्य :

 • 3/4 वाटी गव्हाचे पीठ
 • 1/4 वाटी मैदा
 • 1 चमचा तेल
 • 2 चमचा कसूरी मेथी
 • 2 चिमूट ओवा
 • मीठ चवीनूसार
 • तेल

कृती :

METHI NAMAKPAARE | METHI SHANKARPALE | मेथीचे शंकरपाळे - Meet The Taste

- Advertisement -

 

 • सर्वप्रथम मैदा, गव्हाचे पीठ आणि मीठ घालून ते मिक्स करून घ्या. त्यामध्ये 1 चमचा गरम केलेले तेल घाला.
 • कसूरी मेथी चुरडून पावडर बनवून पिठामध्ये घाला आणि ओवा मिक्स करून घ्या. नंतर ते पाण्याने घट्ट भिजवून ते 15 मिनिट झाकून ठेवा.
 • 15 मिनिटांनी मळलेल्या पीठाचे दोन समान भाग करून घ्यायचे. 1 पिठाचा गोळा पातळ लाटून तो सुकू नये म्हणून झाकून ठेवा.
 • दुसऱ्या पिठाच्या गोळ्याची पोळी लाटून घ्या.आता त्याच्यावरच्या बाजुला तेल लावून झाकलेली पोळी त्यावर ठेवा.
 • दोन्ही पोळ्या एकमेकांनवर ठेवून थोडे लाटून घ्या.
 • कातणाने शंकरपाळ्याला आकारात कापून घ्या.
 • तेलामध्ये मध्यम आचेवर कडक होईपर्यंत तळून घ्या.

 

- Advertisement -

हेही वाचा :

Recipe : मिक्स कडधान्याचे हेल्दी सॅलेड

- Advertisment -

Manini