घरमहाराष्ट्रOnion Export Ban : केंद्राकडे महाराष्ट्राचा स्वाभिमानी बाणा दाखवतील का? रोहित पवारांचा...

Onion Export Ban : केंद्राकडे महाराष्ट्राचा स्वाभिमानी बाणा दाखवतील का? रोहित पवारांचा अजितदादांना टोला

Subscribe

मुंबई : केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर घातलेली बंदी आणखी काही काळ वाढविली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याने त्याचे तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता आहे. या निर्णयावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी मोदी सरकारबरोबरच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. (Onion Export Ban Will Maharashtra show self-respect towards the Centre Rohit Pawars message to Ajit Dada)

हेही वाचा – Devendra Fadnavis : माझी उपमा सार्थ ठरवण्याचा उद्धव ठाकरेंकडून आटोकाट प्रयत्न; फडणवीसांचा टोला

- Advertisement -

देशांतर्गत उपलब्धता वाढवणे आणि किमती नियंत्रणाच्या उद्देशाने केंद्र सरकारने 31 मार्च 2024पर्यंत कांदा निर्यातबंदी लागू केली होती. मात्र, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखालील समितीने कांद्याच्या निर्यातीला मंजुरी दिली असून याबाबत लवकरच अधिसूचना काढण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी गेल्या महिन्यात दिली होती. पण नंतर असा कोणाताही निर्णय घेतला नसल्याचे स्पष्ट झाले.

यावरून विरोधकांनी मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली होती. कांदा निर्यात बंदी उठवली म्हणून काही जण उगाच टाळ्या वाजवत होते. सत्य परिस्थिती ही आहे की, कांदा निर्यातबंदी उठवलेलीच नाही. व्यापाऱ्यांना तारा आणि शेतकऱ्यांना मारा असा या सरकारचा नारा असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली होती.

- Advertisement -

अशातच काल, शुक्रवारी केंद्र सरकारने सुधारित अधिसूचना जारी करून पुढील आदेशापर्यंत ही निर्यातबंदी लागू राहील, असे म्हटले आहे. त्यावरून आमदार रोहित पवार यांनी ट्वीट करत संताप व्यक्त केला आहे. निर्यातबंदीमुळे आतापर्यंत राज्यातील शेतकऱ्यांचे तब्बल पाच हजार कोटी रुपयांहून अधिकचे नुकसान झाले आहे. लवकरच ही निर्यातबंदी संपुष्टात येईल आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा असताना शेतकरीविरोधी दुष्ट केंद्र सरकारने निर्यादबंदीचा कालावधी आणखी वाढवला, हे दुर्दैव आहे, अशा शब्दांत रोहित पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

हेही वाचा – Liquor Policy Case : केजरीवाल यांच्यानंतर पंजाबच्या मुख्यमंत्र्यांवर अटकेची टांगती तलवार?

जागावाटपाच्या चर्चेसाठी रोज दिल्लीवाऱ्या करणारे आणि कथित ‘विकासा’साठी सत्तेत गेलेले नेते कांदा निर्यातबंदी उठवण्याची मागणी केंद्र सरकारकडे करून महाराष्ट्राचा स्वाभिमानी बाणा दाखवतील का? की शेतकऱ्यांचा विकास हा या नेत्यांच्या दृष्टीने विकास नाही? असे त्यांनी थेट अजित पवार यांचे नाव न घेता सुनावले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -