Tuesday, April 30, 2024
घरमानिनीKitchenRecipe : उपवासासाठी खास वरईचे आप्पे

Recipe : उपवासासाठी खास वरईचे आप्पे

Subscribe

अनेकदा उपवासाला काय खावं हेच कळत नाही. अशावेळी तुम्ही वरईचे आप्पे नक्कीच ट्राय करु शकता.

साहित्य :

  • 1 कप वरई
  • पाव कप साबुदाणा
  • 3 कप दही
  • जिरे
  • मीठ
  • हिरव्या मिरचीचा ठेचा

कृती :

Rekha Chinoy દ્વારા રેસીપી ફરાળી અપ્પે (Farali Appe Recipe In Gujarati) -  કૂકપૅડ

- Advertisement -

 

  • सर्वप्रथम साबुदाणा मिक्सरला दळून घ्या. दळून झाल्यानंतर त्यामध्ये वरई घालून पुन्हा मिक्सरला एकदा फिरवून घ्या.
  • मग साबुदाणा आणि वरईचे मिश्रण एका बाउलमध्ये काढून घ्या. त्यानंतर त्यामध्ये दही मिक्स करून घ्या.
  • मग त्यामध्ये एक चमचा जिरे, हिरव्या मिरचीचा ठेचा, चवीनुसार मीठ घालायचे. त्यानंतर मिश्रणात थोडं पाणी घालून ते व्यवस्थित मिक्स करा.
  • अशा प्रकारे तुम्ही उपवासाच्या आप्प्यांचे पीठ तयार करा. (टिप – पीठ जास्त पातळं आणि जास्त घट्ट नको) आप्प्याचं पीठ तयार झाल्यानंतर ते 15-20 मिनिट झाकून बाजूला ठेवून द्या.
  • त्यानंतर आप्पे पात्र गरम करून त्यामध्ये तेल सोडा आणि जे बॅटर तयार करून घेतलं आहेत ते आप्पे पात्रात घाला.
  • मग झाकण ठेवून ते 2 ते 3 मिनिटे शिजवून घ्या आणि पुन्हा त्यात तेल सोडून दोन्ही बाजूने नीट भाजून घ्या.
  • अशा प्रकारे तुमचे उपवासाचे आप्पे नारळ्याच्या चटणीसोबत तयार सर्वांना सर्व्ह करा.

हेही वाचा :

Recipe : Yummy मावा कुल्फी

- Advertisment -

Manini