मुंबई : जून 2024 पासून महाराष्ट्रातील प्रत्येक मुलीला सर्व शिक्षण मोफत देण्यात येणार आहे, अशी घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. मात्र फक्त मुलींना सर्व शिक्षण मोफत न देता मुलांनाही मोफत शिक्षण द्यावे, असा मुद्दा शिवसेना उबाठा गटाचे आमदार विलास पोतनीस यांनी आज विधानपरिषेदत मांडला. (Budget Session Give free education to all poor students Thackeray groups demand)
हेही वाचा – Chandrakant Patil : दुष्काळग्रस्त भागातील विद्यापीठांची फी होणार माफ; विद्यार्थ्यांना दिलासा
विलास पोतनीस म्हणाले की, चंद्रकांत पाटील यांच्या घोषणेनंतर गरीब कुटुंबातील मुलांनी व त्यांच्या पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. सरकारने मुलगा-मुलगी भेद न करता सर्वच गरीब विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यांनी म्हटले की, मुलगा मुलगी भेद न करता, 8 लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या पालकांच्या मुला-मुलींना म्हणजे सर्वच विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण द्यावे. ज्या पालकांचे उत्पन्न आठ लाखांच्या आत आहे अशा मुलींना शैक्षणिक शुल्क माफी देण्यात आली आहे. ज्यांना आर्थिक अडचणीमुळे उच्च शिक्षण घेता येत नाही, अशा सर्व मुला-मुलींमध्ये भेद न करता शुल्क माफी द्यावी, असे विलास पोतनिस यांनी म्हटले आहे.
हेही वाचा – Vijay Wadettiwar : “मोदींची गॅरंटी” कधीही पूर्ण न होणारी; ‘चाय पे चर्चेचा’ संदर्भ देत वडेट्टीवारांची टीका
चंद्रकांत पाटील काय म्हणाले?
दरम्यान, चंद्रकांत पाटील म्हणाले की, जून 2024 पासून महाराष्ट्रातील प्रत्येक मुलीला सर्व शिक्षण मोफत देण्यात येणार आहे. तसेच, ज्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी वसतिगृह मिळत नाही, त्यांना दरमहा 5 हजार 300 रुपये देण्यात येतील. महाराष्ट्रातील प्रत्येक मुलीला शिक्षण, प्रवास, राहाणे आणि भोजन मोफत देणार असल्याची घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. तसेच पालकांना मुलींच्या शिक्षणासाठी 1 रुपयाही खर्च करण्याची गरज नाही. अगदी प्रवेश फीपासून ते परीक्षेच्या फी पर्यंत, सर्व खर्च हा राज्य सरकारद्वारे केला जाणार आहे. मेडीकल, इंजिनीयरिंग सारख्या महागड्या शिक्षणा सोबत एकूण 800 कोर्स मध्ये मुलींना मोफत शिक्षण मिळणार आहे. याबाबत स्वतः उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अधिकृत घोषणा केली आहे.