Friday, April 26, 2024
घरमानिनीBeautyLong Lasting Makeupसाठी 'या' 5 सोप्या पद्धती तुम्हाला माहीतच हव्यात

Long Lasting Makeupसाठी ‘या’ 5 सोप्या पद्धती तुम्हाला माहीतच हव्यात

Subscribe

महिला आणि मुलींना मेकअप (Makeup) करायला जास्त आवडते. यामुळे महिला मोठ्या प्रमाणात ब्यूटी प्रोडक्ट्सचा ( Beauty Products) वापर करतात. पण, या ब्यूटी प्रोडक्ट्समुळे मेकअप दीर्घकाळ (Long Lasting) टिकतो असे होत नाही. त्याचबरोबर मेकअप खराब देखील होतो. काही वेळी तुमच्यासोबत लाजिरवाण्या घटना देखील घडतात. यामुळे मेकअप दीर्घकाळ टिकणारे प्रोडक्ट्स मिळत नाही आणि ते मिळाले तर ते तुमच्या खिशाला परवडणारे नसतात. यामुळे महिला दीर्घकाळ मेकअप (लॉन्ग लास्टिंग) करणे खूप कठीण देखील असते. आज आपण लॉन्ग लास्टिंग मेकअपसाठी 5 सोप्या पद्धती जाणून घेऊ या.

मेकअपला असे बनवा लॉन्ग लास्टिंग

त्वचा तयार करा

चेहऱ्यावर मेकअप करण्यापूर्वी तुम्ही तुमची स्किनला रेडी करा. करण, मेकअप करण्यापूर्वीची खूप महत्त्वाची स्टेप आहे. तुमच्या चेहरा तेलकट झाला असेल आणि घाण जमा झाले असेल तर ते स्वच्छ करू घ्यावे. तुम्ही तुमच्या स्किनला हायड्रेट करण्यासाठी मॉइश्चरायझ वापर करा. चेहऱ्यावर मेकअप दीर्घकाळ टिकण्यासाठी चांगले प्राइमरचा वापर करा.

- Advertisement -

दीर्घकाळ टिकणाऱ्या प्रोडक्ट्सचा वापर करावा

तुमचा मेकअप दीर्घकाळ टिकवायचा असेल तर असे प्रोडक्ट्स विकत घ्या, जे लॉन्ग लास्टिंग असतील. चांगले प्रोडक्ट्स बनविणाऱ्या कंपनीचे मेकअप प्रोडक्ट्स विकत घ्या. दीर्घकाळ टिकणाऱ्या स्मज, प्रूफ किंवा वॉटर प्रूफ इ. जसे लिपस्टिक, ऑय लायनर, आय शॅडो तुमचा मेकअप लॉन्ग लास्टिंग बनवितात.

- Advertisement -

 सेटिंग पावडरचा वापर करा

तुमचा मेकअप करण्यासाठी मार्केटमधील चांगल्या क्वालिटीचे प्रोडक्ट्सचा वापर करावा. यामुळे तुमचा मेकअप दीर्घकाळ टिकतो. तुम्ही तुमचे सर्व मेकअप प्रोडक्स स्किनवर वापरल्यानंतर ट्रांसलूसेंट पावडरला हलक्या पद्धतीने तुमच्या स्किनवर लावा. यामुळे तुमच्या स्किनवरील ऑयल कमी करण्यास मदत करते.

स्प्रेचा वापर करा

तुम्ही जेव्हा मेकअप लावाल, तेव्हा, तो चांगला सेट होण्यासाठी सेटिंग स्प्रेची मदतीने तो सेट करा. सेटिंग स्प्रे हे तुमचा मेकअपला लॉन्गलास्टिंग ठेवण्यास मदत करतो. मार्केटमध्ये तुम्हाला खूप सेटिंग स्प्रे उपलब्ध आहेत.

तुमच्या चेहऱ्याला जास्त स्पर्श करू नका

तुम्ही मेकअप केल्यानंतर तुमच्या चेहऱ्याला जास्त टच करू नका, नाही तर मेकअप खराब होण्याचे प्रमुख कारण आहे. तुम्ही मेकअपला हाताने टच करतो. जेव्हा तुम्ही चेहऱ्याला हाताने टच करता. एक जागी ऑयल आणि डर्ट दुसऱ्या ठिकाणी जाते.


हेही वाचा – ‘या’ तीन गोष्टीने मिळवा Korean Glass Skin

- Advertisment -

Manini