घरदेश-विदेशठरलं! 2024च्या निवडणुकीतील लढत NDA विरुद्ध INDIA; बंगळुरूच्या बैठकीत निर्णय

ठरलं! 2024च्या निवडणुकीतील लढत NDA विरुद्ध INDIA; बंगळुरूच्या बैठकीत निर्णय

Subscribe

बंगळुरू : आगामी लोकसभा निवडणुकीचे वेध सर्वांनाच लागले आहेत. त्यादृष्टीने देशातील प्रमुख भाजपा आणि काँग्रेस या पक्षांनी मित्रपक्षांच्या बैठकी बोलावल्या होत्या. भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीची (NDA) बैठक नवी दिल्लीत तर, विरोधकांची बंगळुरूमध्ये बैठक आयोजित केली. बंगळुरूच्या बैठकीत विरोधकांच्या आघाडीचे नाव आता इंडिया (INDIA) करण्याचा निर्णय घेण्यात आला.

भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी ‘अब की बार मोदी सरकार’चा नारा देत 2014मध्ये केंद्रात सत्तेवर आल्यानंतर 2019मध्येही रालोआने निर्विवाद बहुमत मिळविले. या निवडणुकीत विरोधकांनी एकत्र येण्याचा प्रयत्न केला, परंतु कोलकात्यातील रॅलीच्या पुढे त्यांची ही एकी पुढे टिकलीच नाही. त्या निवडणुकीला प्रत्येक पक्ष स्वतंत्रपणे सामोरा गेला. त्यामुळे रालोआला तसा विरोध झाला नाही.

- Advertisement -

आता 2024च्या निवडणुकीसाठी पुन्हा एकदा विरोधकांच्या एकजुटीचे प्रयत्न सुरू झाले आहेत. 23 जून 2023 रोजी विरोधकांची पहिली बैठक बिहारमधील पाटणा येथे झाली. त्या बैठकीला 15 विरोध पक्ष उपस्थित होते. त्यानंतर दुसरी बैठक आज, मंगळवारी बंगळुरूमध्ये बोलावण्यात आली होती. या बैठकीत 25 विरोधी पक्षांच्या नेत्यांनी हजेरी लावली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी या बैठकीसाठी सर्व पक्षांना निमंत्रण पाठविले आहे. या बैठकीला महाराष्ट्रातून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, माजी मंत्री आदित्य ठाकरे तसेच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत उपसथित होते.

विरोधकांच्या या नव्या आघाडीचे नाव INDIA ठेवण्याचा प्रस्ताव काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या बैठकीत मांडला. सर्व पक्षांनी याला अनुमोदन दिले आणि INDIA या नावाखालीच आगामी लोकसभा निवडणूक एकत्रितपणे लढवण्याचा निर्धार करण्यात आला.

- Advertisement -

I – Indian (इंडियन)
N – National (नॅशनल)
D – Developmental (डेव्हलपमेन्टल)
I – Inclusive (इन्क्लुझिव्ह)
A – Alliance (अलायन्स)

असा या आघाडीच्या नावाचा फुलफॉर्म आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -