घरदेश-विदेश...तर रेल्वेच्या दुर्घटना वारंवार का घडतायत? ठाकरे गटाचा थेट सवाल

…तर रेल्वेच्या दुर्घटना वारंवार का घडतायत? ठाकरे गटाचा थेट सवाल

Subscribe

मुंबई : ओडिशामधील बालासोर येथे झालेल्या रेल्वेच्या इतिहासातील सर्वात मोठ्या अपघाताला चार महिनेही उलटत नाहीत, तोच आता आणखी एका रेल्वे दुर्घटनेत सहा प्रवाशांचा मृत्यू व सुमारे 200 प्रवासी जखमी झाले आहेत. ताजी रेल्वे दुर्घटना बिहारच्या बक्सर जिल्ह्यातील आहे. रेल्वेची सुरक्षा यंत्रणा कशी अत्याधुनिक करण्यात आली आहे, अशी स्वतःचीच आरती मोदी सरकार गेली काही वर्षे ओवाळून घेत आहे. यंत्रणा खरोखरच इतकी आधुनिक झाली असेल तर रेल्वेच्या दुर्घटना वारंवार का घडत आहेत? असा थेट सवाल ठाकरे गटाने केला आहे.

हेही वाचा – सरकारी नोकऱ्यांमध्ये कंत्राटी भरतीचा धडाका, नोव्हेंबरपर्यंत भरणार एक लाख पदे

- Advertisement -

दिल्लीहून गुवाहाटीकडे जाणारी आनंद विहार कामाख्या नॉर्थ ईस्ट एक्स्प्रेस ही रेल्वेगाडी बुधवारी मध्यरात्री अचानक रुळावरून घसरली. बक्सरच्या रघुनाथपूर स्टेशनजवळ आधी एसी 3 टियरचे दोन डबे उलटले. नंतर एकूण 21 डबे रुळावरून घसरल्याने एक्प्रेसमधील प्रवाशांनी जिवाच्या आकांताने आरडाओरडा केला. सुदैवाने मध्यरात्रीपूर्वीची वेळ असल्याने आसपासच्या भागांतील लोकांनी तत्काळ रेल्वेमार्गाच्या दिशेने धाव घेत मदतकार्य सुरू केले. बक्सर जिल्ह्यातील डॉक्टरांची पथके आणि जिल्हा प्रशासनाची मदत व बचाव कार्याची पथके वेळेत पोहोचल्याने दुर्घटनेतील बळींचा आकडा मर्यादित राखता आला, असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सामना दैनिकातील अग्रलेखात म्हटले आहे.

अपघात की घातपात?

आता दुर्घटनेनंतर हा घात की अपघात, अशी चर्चा होत असली तरी बिहारच्या नक्षलग्रस्त प्रभावित जिल्ह्यांच्या यादीत बक्सरचा समावेश नसल्यामुळे लगेचच या घटनेला घातपात मानायला पोलीस अधिकारी तयार दिसत नाहीत. तथापि, ज्या ठिकाणी ही दुर्घटना घडली तेथून पुढेही काही अंतरावर रेल्वेमार्गावरील रूळ तुटलेल्या अवस्थेत आढळले आहेत. एकाच ठिकाणी नव्हे, तर अनेक ठिकाणी रूळ तुटलेले दिसत असल्याने हा अपघात नसून घातपात असावा असा संशय व्यक्त केला जात आहे, असे ठाकरे गटाने म्हटले आहे.

- Advertisement -

चौकशी समित्यांचे दुष्टचक्र

कुठल्याही रेल्वे दुर्घटनेनंतर तांत्रिक चूक, मानवी चूक किंवा घातपात या दुर्घटनांच्या संभाव्य कारणांभोवती काही दिवस चर्चा फिरत राहते, चौकशी समिती वा आयोग नेमले जातात, अहवाल सादर केले जातात. त्यात रेल्वेच्या त्रुटींवर जसे बोट ठेवले जाते तसेच सुरक्षाविषयक उपाययोजनांची जंत्रीही मांडली जाते. मात्र असे अहवाल सादर होईपर्यंतच वा त्याच्या मागेपुढे नवी दुर्घटना घडते व पुन्हा त्याच त्या चौकशा आणि त्यांच्या अहवालांच्या जाडजूड फायली हे दुष्टचक्र मागच्या अपघाताकडून पुढच्या अपघाताकडे सरकत जाते, असे या अग्रलेखात नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा – शाळा, रुग्णालये, मैदाने दत्तक देऊन खासगी लोकांच्या घशात; आता पोलीसही कंत्राटी|

लोकांचा रेल्ववरील विश्वास डळमळीत झाला

लागोपाठ घडणारे रेल्वे अपघात आणि त्यात जाणारे बळी यामुळे रेल्वे प्रशासनाच्या एकूणच कारभाराबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अपघात असो वा घातपात, मात्र सर्वाधिक सुरक्षित प्रवास म्हणून जनतेचा ज्या रेल्वेवर विश्वास होता, तो विश्वास गेल्या काही वर्षांत डळमळीत झाला आहे, हे तर मान्य करावेच लागे, असे ठाकरे गटाने म्हटले आहे.

रेल्वेबळी सरकारच्या दुर्लक्षाचे का?

आधी बालासोरमध्ये तीन रेल्वेगाड्या एकमेकांवर आदळून 295 प्रवासी मृत्युमुखी पडले. त्यातील 28 अनोळखी मृतदेहांवर तर आता बुधवारी, म्हणजे तब्बल चार महिन्यांनंतर अंतिम संस्कार करण्यात आले. या दुर्दैवी रेल्वे प्रवाशांच्या चितेची आग शांत होण्यापूर्वीच आता बिहारातही रेल्वेचे 21 डबे रुळावरून घसरल्याने सहा प्रवाशांचा मृत्यू झाला. शंभरहून अधिक प्रवासी जखमी झाले. प्रवाशांचा जीवनप्रवासच थांबवणारे हे वाढते ‘रेल्वे बळी’ सरकारच्या दुर्लक्षाचे आहेत की रेल्वे प्रशासनाच्या आधुनिकीकरणाचे, हे आता सरकारनेच सांगावे, असे ठाकरे गटाने विचारले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -