Tuesday, April 30, 2024
घरमानिनीBenefits of Ladyfinger : भेंडीच्या पाण्यानेही होतो वेट लॉस

Benefits of Ladyfinger : भेंडीच्या पाण्यानेही होतो वेट लॉस

Subscribe

लहान मुले असो वा मोठे भेंडीची भाजी खायला सर्वांना आवडते. लोक वेगवेगळ्या प्रकारे भेंडीची भाजी बनवतात. भेंडीची भाजी टेस्टी असण्यासोबतच ती खूप हेल्दी देखील आहे. पण केवळ भेंडीच नव्हे तर भेंडीचे पाणीही आरोग्यासाठी खूप लाभदायी मानले जाते. तज्ज्ञाच्या मते, भेंडीमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. भेंडी आपल्याला अनेक आजारांपासून वाचविते. भेंडीची आपण सहसा भाजी करतो, पण खूप कमी लोकांना माहिती असेल की भेंडीचं पाणीही शरीरासाठी तितकचं फायदेशीर असते. भेंडीच्या भाजी व्यतिरिक्त त्याचे पाणीदेखील आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. एक ग्लास भेंडीचे पाणी नियमितपणे प्यायल्याने शरीराला खूप फायदे होतात. चला जाणून घेऊया भेंडीचे पाणी कसे बनते आणि याचे फायदे काय आहेत. ते कसे बनवावे आणि ते प्यायची योग्य वेळ कोणती आहे.

कोलेस्ट्रॉल कंट्रोल होते

कोलेस्ट्रॉल वाढल्याने ह्रदयविकाराचा धोका वाढतो, त्यासाठी ते नियंत्रणात ठेवणे गरजेचे असते. कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी भेंडीचे सेवन लाभदायी असते. यात फायबर उच्च प्रमाणात असते. जे कोलेस्ट्रॉल नियंत्रणासाठी मदत करते.

- Advertisement -

हृदयाच्या आरोग्यासाठी

अभ्यासानुसार भेंडीमध्ये असे संयुगे असतात जे रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित करण्यास मदत करतात. यामुळे आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांचा धोका कमी होण्यास मदत होऊ शकते.

मधुमेहातही फायदेशीर

मधुमेहाच्या रुग्णांसाठी भेंडीचे सेवन लाभदायी आहे. डायबिटीजचे रुग्ण जर भेंडीच्या पाण्याचे सेवन करत असतील, तर यामुळे ब्लड शुगर नियंत्रणात राहते.

- Advertisement -

प्रतिकारशक्ती वाढवते

भेंडीत व्हिटामिन सी मोठ्या प्रमाणात असते. यामुळे प्रतिकारशक्ती वाढवण्यातही भेंडीची मोठी मदत होते. बदलत्या ऋतूत ज्या लोकांना सर्दी, खोकला, तापाची समस्या असते, त्यांनी आठवड्यात 1-2 वेळा भेंडीचे पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो.

डोळ्यांसाठी फायदेशीर

भेंडीत व्हिटामिन ए आणि बीटा कॅरोटिन असते. यामुळे डोळ्यांची क्षमताही वाढते. चांगल्या डोळ्यांसाठी भेंडीच्या पाण्याच्या नियमित सेवनाचा सल्ला दिला जातो.

कसे बनवायचे भेंडीचे पाणी

  • भेंडीचे पाणी बनवण्यासाठी 8 ते 10 भेंड्या मधून कापून त्या रात्रभर दोन ग्लास पाण्यात भिजवून ठेवाव्या.
    भेंडी रात्रभर पाण्यात भिजल्यानंतर त्यातून उरलेला रस पिळून तो पाण्यात मिसळावा.
  • भेंडीचे पाणी तयार झाले आहे. याशिवाय भेंडीचे पाणी उकळूनही तयार केले जाऊ शकते.
  • भेंडीचे पाणी तयार करण्यासाठी 2 ग्लास पाणी गरम करा.
  • या पाण्यात 10 ते 15 भेंड्या मधून कापून टाका.
  • 2 ते 3 मिनिटांसाठी भेंड्या पाण्यासोबत उकळू द्याव्या.
  • जेव्हा भेंड्यांतील सर्व रस पाण्यात मिसळेल तेव्हा त्या ग्लासमधून काढून घ्याव्या.

    भेंडीचे पाणी पिण्याची उत्तम वेळ

    वजन कमी करण्यासाठी आणि योग्य पचन होण्यासाठी सकाळी किंवा जेवणापूर्वी भेंडीचे पाणी प्या. भेंडीच्या पाण्याचे सेवन कधीही केले जाऊ शकते. हे पाणी तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी देखील पिऊ शकता.

हेही पहा :

_______________________________________________________________________
Edited By : Nikita Shinde

- Advertisment -

Manini