Monday, April 29, 2024
घरमानिनीBeautyउन्हाळा स्पेशल, आंब्याचा फेसमास्क

उन्हाळा स्पेशल, आंब्याचा फेसमास्क

Subscribe

उन्हाळा म्हटले की डोळ्यासमोर उभा राहतो रसदार आणि चवदार आंबा. अनेकजण खास आंब्यासाठी हा सिझनची वाट पाहत असतात. आंबा जसा चवीसाठी प्रसिद्ध आहे तसाच तो आरोग्यच्या दृष्टीनेही महत्वाचा आहे. आंब्यामध्ये असणारे अँटीऑक्सीडेंट्स शरीरासाठी फायदेशीर असतात. पण शरीरासाठी फायदेशीर असणारा आंबा सौंदर्यासाठीही उपयुक्त ठरतो. आंब्यामध्ये असणारा व्हिटॅमिन ए नैसर्गिक चमक टिकवून ठेवण्यास मदत करतो. उन्हाळा स्पेशल असा आंब्याचा फेसपॅक तुम्ही या दिवसात त्वचेची चमक वाढविण्यासाठी वापरू शकता.

आंबा आणि मध – आंब्यामध्ये ‘व्हिटॅमिन ए’ मुबलक प्रमाणात असते, जे त्वचेची काळजी घेण्यासाठी रेटिनॉल म्हणून ओळखले जाते. मुरुमांच्या समस्येने त्रस्त असाल तर आंबा आणि मध यांचा फेसपॅक लावा. हा फेसपॅक मुरुमांची समस्या कमी करण्यासाठी उपयोगी ठरेल.

- Advertisement -

साहित्य –
4 चमचे ताज्या आंब्याचा पल्प
2 चमचे मध
1 ते 1/2 टेबलस्पून बदाम तेल
1/2 टीस्पून हळद

कृती – एका बाऊलमध्ये आंब्याचा पल्प, हळद, मध आणि बदामाचे तेल मिक्स करा. तयार गुळगुळीत पेस्ट स्वच्छ धुतलेल्या चेहऱ्यावर लावा. हा फेसपॅक 20 मिनिटे चेहऱ्यावर ठेवा आणि त्यानंतर पाण्याने धुवा.

- Advertisement -

आंबा आणि तांदळाचे पीठ – उन्हाळ्यात त्वचेच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी आंबा आणि तांदळाच्या पिठाचे फेसपॅक उपयुक्त ठरेल. हा फेसपॅक लावल्याने त्वचा एक्सफॉलिएट होण्यास मदत होईल आणि डेड स्किन निघून जाईल.

साहित्य –
1 टेबलस्पून ताज्या आंब्याचा पल्प
1 चमचा मध
1 चमचा तांदळाचे पीठ
1 टेबलस्पून दूध

कृती – एका भांड्यात आंब्याचा पल्प, मध, तांदळाचे पीठ आणि दूध मिक्स करा. तयार पेस्ट 10 मिनिटे चेहऱ्यावर ठेवा आणि नंतर कोमट पाण्याने वर्तुळाकार पद्धतीने चेहरा स्वच्छ धुवा.

आंब्याच्या मातीचा मास्क – त्वचेची चमक अबाधित राहण्यासाठी आंब्यासोबत तुम्ही मुलतानी मातीचा फेसपॅक तयार करण्यासाठी वापर करू शकता. मुलतानी माती चेहऱ्यावरील तेलकटपणा नियंत्रीत करेल आणि मुरुमांच्या समस्येपासूनही मुक्ती मिळेल.

साहित्य –
2 टेबलस्पून ताज्या आंब्याचा पल्प
1 टेबलस्पून मुलतानी मिट्टी
1 टेबलस्पून दही
1/4 कप दूध

कृती –
एका भांड्यात सर्व गोष्टी मिक्स करा. 20 मिनिटे तयार फेसपॅक तुम्ही त्वचेवर लावून ठेवायला हवा. यानंतर तुमच्या रेग्युलर पण सौम्य फेशवॉशने तोंड स्वच्छ धुवून घ्या.

 

 

 

 

 


हेही पहा : ओठांवर मुरूमं येत असतील तर करा हे सोपे उपाय 

 

- Advertisment -

Manini