घरमुंबईLok Sabha : कमळाबाईच्या रिमोटने चालते शिंदेंची शिवसेना; श्रीकांत शिंदेंच्या उमेदवारीवर विरोधकांची...

Lok Sabha : कमळाबाईच्या रिमोटने चालते शिंदेंची शिवसेना; श्रीकांत शिंदेंच्या उमेदवारीवर विरोधकांची टीका

Subscribe

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कल्याण मतदारसंघातून महायुतीचा उमेदवार हे डॉक्टर श्रीकांत शिंदेंच असतील घोषणा करतानाच त्यांना महायुतीतील सर्व पक्ष साथ देऊन बहुमताने निवडून आणतील, असा विश्वासही व्यक्त केला. मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणेनंतर आता विरोधकांनी शिंदे गटासह भाजपावर टीकास्त्र सोडले आहे.

मुंबई : लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. प्रत्येक पक्षाने पहिल्या टप्प्यातील आपल्या उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. असं असलं तरीही महायुती आणि मविआमध्ये अनेक जागांवरून तिढा कायम आहे. त्यातच महायुतीमधील घटक पक्ष शिंदे गट यांची कल्याणची जागा भाजपा लढवणार असं म्हटलं जात होतं. यावरून राजकारण रंगलं होतं. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कल्याण मतदारसंघातून महायुतीचा उमेदवार हे डॉक्टर श्रीकांत शिंदेंच असतील घोषणा करतानाच त्यांना महायुतीतील सर्व पक्ष साथ देऊन बहुमताने निवडून आणतील, असा विश्वासही व्यक्त केला. मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणेनंतर आता विरोधकांनी शिंदे गटासह भाजपावर टीकास्त्र सोडले आहे. (lok sabha election 2024 Shiv Sena runs with Kamalabais remote Opposition criticizes Srikant Shindes candidature)

काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी ट्वीट करताना म्हटले की, महायुतीची महाशक्ती भाजपा आहे, यात कधीच शंका नव्हती. त्यामुळेच आता शिवसेनेचे उमेदवार कोण असावेत, विद्यमान खासदारांची उमेदवारी कापली जाणे, हे निर्णयही भाजपा घेताना दिसते आहे. आता मुख्यमंत्र्यांच्या सुपुत्राची उमेदवारीही फडणवीसांनी घोषित केली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या रिमोट कंट्रोलने एकेकाळी चालणारी एकनाथ शिंदे यांची शिवसेना आता कमळाबाईच्या रिमोट कंट्रोलने चालते आहे हे स्पष्ट आहे, असा टोला लगावला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Loksabha election 2024 : ठाण्यातील वातावरण पाहता महायुतीचा खासदार विजयी होईल – दीपक केसरकर

- Advertisement -

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस? (What did Devendra Fadnavis say?)

दरम्यान, भाजपाच्या स्थापना दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमानंतर नागपुरात पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कल्याण डोंबिवली लोकसभा मतदारसंघामधून श्रीकांत शिंदे हेच आमचे उमेदवार असतील. भारतीय जनता पक्ष त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आहे. पूर्ण ताकदीने आणि मागच्या वेळेपेक्षा जास्त मतांनी श्रीकांत शिंदे यांना कल्याणमधून आम्ही सगळे म्हणजेच भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी, रिपाइं, रासप, आमची जी बृहद युती आहे, ती त्यांना निवडून आणेल, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

हेही वाचा – Lok Sabha 2024 : क्लायमॅक्स इंटरेस्टिंग होईल…, सुषमा अंधारेंच्या निशाण्यावर शिंदे गट

श्रीकांत शिंदे विरुद्ध वैशाली दरेकर लढत (Srikanth Shinde vs Vaishali Darekar fight)

देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणेनंतर आता कल्याणमध्ये डॉक्टर श्रीकांत शिंदे विरुद्ध मविआच्या उमेदवार वैशाली दरेकर अशी लढत पाहायला मिळणार आहे. उमेदवारी घोषित होण्याआधीच श्रीकांत शिंदे यांनी प्रचाराला सुरूवात केली आहे. श्रीकांत शिंदे हे कल्याण डोंबिवलीतून शिवसेनेच्या तिकिटवर याआधी सलग दोन वेळा खासदारपदी निवडून आले आहेत. त्यामुळे यंदा त्यांना विजयाच्या हॅटट्रिकची संधी आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -