Thursday, May 2, 2024
घरमानिनीHealthआंबा खाल्यानंतर हे पदार्थ खाणे टाळा, अन्यथा ...

आंबा खाल्यानंतर हे पदार्थ खाणे टाळा, अन्यथा …

Subscribe

उन्हाळ्याच्या हंगामात म्हणजेच एप्रिल – मे महिना सुरु झाला की, बाजारात आंबे यायला सुरुवात होते. आंबा प्रत्येकाच्याच आवडीचे फळ. केवळ रसदार आंबे खाण्यासाठी प्रत्येकजण या सीझनची आतुरतेने वाट पाहत असतो. आंबे चवीसाठी तर ओळखले जातातच मात्र ते आरोग्यसाठी फायदेशीर असतात. अनेकजण जेवणासोबत आंबा खातात तर अनेक जण दिवसातून कधीही आंब्यावर ताव मारतात. मात्र, आंबा खाल्यानंतर काही पदार्थ खाणे टाळणं आरोग्यसाठी गरजेचे असते कारण असे पदार्थांचे सेवन शरीरासाठी हानिकारक ठरू शकते.

पाणी – अनेकांना आंबा खाल्यानंतर पाणी पिण्याची सवय असते. मात्र, आंबा खाल्यानंतर लगेचच पाणी पिऊ नये. असे केल्याने आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. आंबा खाल्यानंतर लगेच पाणी पिल्यास पोटदुखी, गॅस आणि ऍसिडिटीचा त्रास जाणवू शकतो.

- Advertisement -

कारले – कारलं आरोग्यासाठी गुणकारी मानण्यात येते. मात्र, आंबा खाल्यानंतर लगेचच कारले पाहू नका. आंब्यानंतर कारले खाल्यानंतर मळमळ, उलटी आणि श्वास घेण्यास त्रास होतो. त्यामुळे आंबा खाल्यानंतर कारल्याचे सेवन केल्यास आरोग्यसाठी घातक ठरू शकते.

- Advertisement -

मसालेयुक्त अन्न – अनेकांना मसालेयुक्त पदार्थांच्या जेवणासोबत आंबा खाण्याची सवय असते. मात्र, ही सवय आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक ठरू शकते. आंबा खाल्यानंतर मसालेदार पदार्थ खाल्यास पोटाच्या समस्या उदभवू शकतात. तसेच, तुमच्या त्वचेवर त्याचा विपरीत परिणाम होतो.

दही – उन्हाळ्यात पोट थंड ठेवण्यासाठी डॉक्टर अनेकदा दही खाण्याचा सल्ला देतात. पण, आंबा खाल्यानंतर दही खाणे टाळा. आंबा खाल्यानंतर सर्दी आणि ऍलर्जी होऊ शकते.

कोल्ड ड्रिंक – आंबा खाल्यानंतर कोल्ड ड्रिंक घेणे टाळा, कारण आंब्यात गोडाचं प्रमाण अतिशय जास्त असते. त्यामुळे आंबा खाल्यानंतर कोल्ड ड्रिंकचे सेवन केल्यास शरीरातील साखरेचे प्रमाण वाढू शकते.

 

 

 

 

 


हेही पहा : अंड्यासोबत चुकूनही खाऊ नका हे पदार्थ

- Advertisment -

Manini