वैवाहिक आयुष्यात तणाव निर्माण झालाय? मग करा ‘हे’ वास्तू उपाय

ज्योतिष शास्त्राप्रमाणेच वास्तू शास्त्राला देखील खूप महत्त्वाचे मानले जाते. जेव्हा लोक घर खरेदी करतात किंवा तयार करतात तेव्हा घरामध्ये कळत-नकळत अनेक चूका झालेल्या असतात ज्यामुळे घरामध्ये वास्तू दोष निर्माण होतो. यामुळे घरामध्ये सतत कलह, आजारपण, आर्थिक चणचण यांसारखी नकारात्मकता निर्णाम होऊ लागते. घरामध्ये असलेल्या वास्तू दोषांमुळे नाते संबंध खराब होतात. यामुळेच कधी कधी पती-पत्नीच्या नात्यामध्ये देखील दुरावा निर्माण होतो. यासाठी वास्तूशास्त्रात काही उपाय देखील सांगण्यात आले आहेत. ज्याने पती-पत्नीमध्ये होणारे वाद दूर होऊ शकतील.

वैवाहिक आयुष्यातील वाद मिटवण्यासाठी करा ‘हे’ वास्तू उपाय

Vastu Tips to Have a Positive Impact on Your Marriage

 • जर तुम्हाला तुमचे वैवाहिक आयुष्य सुखमय बनवायचे असेल तर घराच्या उत्तर-पूर्व दिशेला निळा किंवा जांभळा रंग द्या.
 • सुखी वैवाहिक जीवनासाठी तुमचे बेडरुम दक्षिण-पश्चिम दिशेला बनवा आणि तुमच्या बेडरुममध्ये हलका रंग द्या.
 • बेडरुममध्ये लोखंड किंवा कोणत्याही धातूपासून तयार बेडवर झोपू नका. झोपण्यासाठी लाडकी बेडचा वापर करा.
 • बेडवर हलक्या फुलांची डिझाईन असणाऱ्या बेडशीटचा वापर करा.
 • बेडरुममध्ये कधीही काळ्या, निळ्या किंवा जास्त भडक रंगांचा वापर करु नये.
 • बेडसमोर कधीही आरसा लावू नका यामुळे नात्यामध्ये तणाव निर्माण होतो.
 • झोपताना तुमचे डोके दक्षिण किंवा पूर्व दिशेस ठेवा.
 • तुमचा बेडरुम नेहमी स्वच्छ आणि सुगंधी ठेवा.
 • बेडरुममध्ये प्रत्येक शुक्रवारी गुलाबांची फुलं ठेवा.
 • बेडरुममध्ये राधा-कृष्णाचा सुंदर फोटो ठेवा यामुळे नात्यात प्रेम वाढते.
 • बेडरुमच्या पश्चिम दिशेला आपल्या पार्टनरसोबतचा फोटो लावा.

 

 


हेही वाचा : तुळशीच्या कुंडीवर काढा ‘ही’ शुभ चिन्हं; होतील सकारात्मक बदल