Tuesday, April 30, 2024
घरमानिनीHealthसोडा, जलजीरा सतत पिणं आरोग्यासाठी घातक

सोडा, जलजीरा सतत पिणं आरोग्यासाठी घातक

Subscribe

उन्हाळ्याचे दिवस सुरु झाले आहेत. या दिवसात शरीराला थंडावा मिळावा म्हणून अनेकजण सोडा, जलजीरा सतत पितात. जेव्हा आपण नैसर्गिक फळांचे ज्युस पितो तेव्हा आपल्या आरोग्यावर त्याचे कोणतेही वाईट परिणाम होत नाहीत. मात्र सतत सोडा, जलजीरा प्यायल्याने आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. काहीजण पोटातला गॅस कमी करण्यासाठी सोडा सतत पित असतात. पण जर हा अतिप्रणामात घेतल्यास याचे वाईट परिणाम लिव्हरवर होऊ शकतात.

सोडा, जलजीरा आरोग्यासाठी घातक

Iced Jaljeera Recipe

- Advertisement -
  • सतत सोडा प्यायल्याने फॅटी लिव्हरची समस्या उद्भवू शकते.
  • सोडा, जलजीरामधील रसायनांचा थेट परिणाम यकृत आणि मूत्रपिंडावरही परिणाम होऊ शकतो.
  • ज्या लोकांना दम्याचा त्रास आहे, त्यांनी सोडा प्यायल्यास त्यांना श्वसनाचा त्रास वाढू शकतो.
  • बाजारात विकल्या जाणार्‍या जलजीरा पावडरमध्ये हिमालयीन मीठ म्हणजेच काळे मीठ जास्त प्रमाणात असते, त्यामुळे रक्तदाब वाढू शकतो.गरोदर स्त्रिया किंवा बाळाला स्तनपान करणाऱ्या महिलांनी विशेषतः असले पेय घेऊ नये.
  • मधुमेही रुग्णांनी आम पन्ना चूर्ण पिणे टाळावे कारण त्यात कॅलरीज जास्त असतात.
  • ते जास्त प्रमाणात प्यायल्याने अॅसिडिटी, अॅलर्जी आणि पोटाशी संबंधित आजार होऊ शकतात.
  • फ्लेवर्ड आणि एसेन्स फळांच्या रसामुळे लिव्हरला नुकसान होऊ शकते.

हेही वाचा :

Water Benefits : उन्हाळ्यात नेमकं किती पाणी प्यावं?

- Advertisment -

Manini