Friday, May 10, 2024
घरमानिनीRelationshipनातेसंबधात दुरावा आलाय, मग 'या' 5 टिप्सने करा दूर

नातेसंबधात दुरावा आलाय, मग ‘या’ 5 टिप्सने करा दूर

Subscribe

नातेसंबंध जोडणं जेवढं सोपं तेवढेच ते टिकवून ठेवणे कठीण. त्यातच हल्ली प्रत्येक व्यक्ती ताणतणावात जगत असते. हा ताण कधी कामातून आलेला असतो तर कधी मतभेदातून. यामुळे साहजिकच याचा थेट परिणाम नातेसंबंधावर होतो. यामुळे नातेसंबधात दुरावा येतो. पण जर नातं टिकवायचे असेल तर काही साध्या टिप्स वापरून हा दुरावा दूर करता येतो.

4 Signs There's A Crisis In Your Relationship - WomenWorking

- Advertisement -
  • इगो बाजूला ठेवा

इगो म्हणजे अहंकार. अहंकार हा प्रत्येकात असतो .पण जेव्हा तो नातेसंबंधात येऊ लागतो तेव्हा मात्र परिस्थिती कठीण होऊन जाते. यामुळे नाते टिकवायचे असेल तर इगो बाजूला ठेवणे गरजेचे आहे.

  • संवाद साधा

नातेसंबंधात आलेला तणाव दूर करण्यासाठी दोघांनी एकमेकांशी संवाद साधणे महत्त्वाचे आहे. पण संवाद साधणे म्हणजे गप्पा, चर्चा करणे असे नसून बऱ्याचवेळा भांडण करून, आदळ आपट करून आपली बाजू मांडत काहीजण व्यक्त होतात. यामुळे खरं तर मन मोकळे होते. पार्टनरला तुमच्या नेमक्या भावना कळतात. त्यातून दोघांमध्ये निर्माण झालेला तणाव निवळण्याची शक्यता असते. तुमच्या पार्टनरला तो किंवा ती नेमके कुठे चुकले ते जाणवेल. त्यातून तुटणार नातं सावरता येईल.

- Advertisement -

पण बऱ्याचवेळा काहीजण काहीच बोलतं नाही. आतल्या आत घुसमटत राहतात. अशावेळी नातं तुटण्याची शक्यता बळावते. यामुळे पार्टनरला बोलतं करावं.

Page 49 | Relationship Crisis Images - Free Download on Freepik

  • गिफ्ट द्या

भांडणानंतर पार्टनरला गिफ्ट देण्याची वेगळीच मजा आहे. कारण त्यातून तुम्ही त्याचा रुसवा दूर करण्याचा प्रयत्न करत असता. त्यामुळे पार्टनरचा राग निवळतो. संवाद सुरू होतो.

  • अपेक्षा करू नका

दुसऱ्याकडून भरमसाठ अपेक्षा करू नका. कारण ज्या व्यक्तीकडून आपल्याला सगळ्यात जास्त अपेक्षा असतात त्याचव्यक्तीकडून दुखावले जाण्याची सर्वाधिक शक्यता असते. यामुळे निरपेक्ष नातं कसं ठेवता येईल याला प्राधान्य द्या.

 


हेही वाचा :

लग्नापूर्वी मुलीला माहिती असाव्यात ‘या’ गोष्टी

- Advertisment -

Manini