घरमनोरंजनकृती सेननचा 3 लाखांचा महागडा ड्रेस, पाहा तिचा हटके लूक!

कृती सेननचा 3 लाखांचा महागडा ड्रेस, पाहा तिचा हटके लूक!

Subscribe

बॅालिवूड अभिनेत्री कृती सेननने बॅालिवूडमध्ये आपली खास ओळख निर्माण केली आहे. अभिनेत्री कृती सेनन सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर तिने बॉलीवूडमध्ये वेगळं स्थान निर्माण केलं आहे.
कृती सेनन (Kriti Sanon)च्या पर्सनॅलिटीचं एका शब्दांत वर्णन करायचं झाले तर एवढचं म्हणून शकतो की ती खूप स्टनिंग आहे. असे असले तरी, तिची अप्रतिम उंची आणि स्लिम फिगर तिला प्रसिद्धीच्या झोतात आणण्याची एकही संधी सोडत नाही. कारण जेव्हाही या हायटेड अभिनेत्रीचा उल्लेख केला जातो तेव्हा सर्वात प्रथम डोळ्यापुढे येते तिची ग्लॅमरस-फिट बॉडी आणि किलर लूक. याशिवाय तिची उंच हाईट आणि स्लिम फिगर तिला नेहमीच लाईमलाईट मध्ये आणण्यास मदत करते. ती जिथे जाते तिथे तिच्या किलर स्टाईलमुळे आणि ब्युटीमुळेच सगळ्यांच्या नजरा खेचून घेते.

बॉलिवूड अभिनेत्री कृती सेननचे चित्रपटांसोबतच फॅशन जगतातही मोठे नाव बनले आहे. क्रितीचे एकापेक्षा एक नवीन लूक सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ती अनेकदा तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. तिच्या या मनमोहक आणि सुंदर लूकचे चाहतेही खूप कौतुक करतात.

- Advertisement -

कृतीसेननचे लेटेस्ट फोटोशुट-
कृतीच्या लेटेस्ट फोटोशुटमध्ये ती ब्लू डेनिम जीन्स आणि लेदर जॅकेटमध्ये दिसली होती. या अभिनेत्रीने तिचे क्रॉप केलेले जॅकेट, डेनिम पँट परिधान केली आहे.या तिच्या 70 च्या दशकातील सर्व प्रमुख फॅशन आयकॉनला अक्षरशः ओड दिली आहे. कृतीने या ड्रेसमध्ये काळ्या उंच टाचांचे बूट घातले आहेत. यासह तिने सूक्ष्म बेस, न्यूड ग्लॅासी लिप्स आणि स्मोकी आय मेकअपसह तिचा स्टायलिश असा बॅासी लुक पूर्ण केला आहे. मोकळे केस कृतीच्या लुकमध्येही भर घालत आहेत. तिने गळ्यात नेकलेस देखील घातला आहे. तिने परिधान केलेल्या या लेदर जॅकेटची किंमत 2 लाख 40 हजार 200 इतकी आहे. त्याचप्रमाणे तिने घातलेल्या ब्लू डेनिम जीन्स किंमत अंदाजे 56 हजार 900 रुपये आहे. तिने घातलेल्या जीन्स आणि लेदर जॅकेटची किंमत पूर्ण 3 लाखांपर्यंत जाते.

कृतीने नुकतेच बॉलीवूडमध्ये ९ वर्ष पूर्ण केले आहेत. या ९ वर्षामध्ये कृतीने अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. सध्या तिचा आगामी चित्रपट “तेरी बातों में ऐसा उल्झा जिया” या चित्रपटाला भरभरुन प्रेम मिळत आहे. कृतीने तिच्या करिअरची सुरुवात तेलगू चित्रपटांपासून केली. साजिद नाडियाडवालाने क्रितीला हेरल आणि तिला बॉलिवूडमध्ये काम करण्याची संधी दिली. हिरोपंती चित्रपटातून कृती सेननने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -