Monday, April 15, 2024
घरमानिनीHealthपावसाळ्यात बॉडी मसाजसाठी 'हे' आहेत बेस्ट ऑईल्स

पावसाळ्यात बॉडी मसाजसाठी ‘हे’ आहेत बेस्ट ऑईल्स

Subscribe

बॉडी मसाजचे फायदे आपल्या सर्वांनाच चांगले माहित आहेत. पण हा बॉडी मसाज केवळ तुमच्या शरीराला आराम देण्याचा एक पर्याय नाही, तर त्याचा तुम्हाला मानसिक फायदाही होतो. पावसाळ्यात जेव्हा सांधेदुखी आणि शरीर जडपणाची समस्या खूप वाढते तेव्हा बॉडी मसाज करणे खूप फायदेशीर ठरते. एवढेच नाही तर तणाव आणि चिंता यापासूनही आराम मिळतो. तसेच हे बॉडी मसाज करत असताना शरीराचे रक्त भिसरण देखील सुधारते. अशातच याचा त्वचेवर आणि आरोग्यावर सकारात्मक परिणाम झालेला दिसून येतो.

13 Best Massage Oils 2022 for a Sexy, Relaxing Night In | Glamour UK

- Advertisement -

तसेच आपण मसाज करताना अनेक प्रकारचे तेल वापरत असतो. ज्यामुळे त्वचेला हायड्रेट राहण्यास मदत होते. यामुळे त्वचेला एक प्रकारचा ग्लो येतो. बॉडी मसाजचे अनेक फायदे असले तरी ऋतूनुसार योग्य तेल निवडले तरच याचे पॉसिटीव्ह फायदे शरीराला मिळू शकतात. केवळ शरीराच्या मालिशसाठी कोणतेही तेल निवडू नका. तर, आज आपण अशा तेलांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्याने तुम्ही पावसाळ्यात बॉडी मसाज केल्याने उपयुक्त ठरेल.

ऑलिव्ह ऑईल

ऑलिव्ह ऑईल हलक्या मालिशसाठी एक उत्तम पर्याय आहे. हे तेल त्वचेमध्ये हळू हळू शोषले जाते. हे तेल आपल्या स्नायूंना आराम देण्यास व त्वचेमध्ये मुलायमपणा किंवा ओलावा राखून ठेवण्यास एकदम परफेक्ट तेल आहे. हे तेल ब्लड सर्क्युलेशन वाढवतं. तसेच स्नायूंमध्ये आलेला जखडपणा किंवा कोणत्याही प्रकारच्या वेदना आणि सूज दूर करण्यास अगदी सहज मदत करते. नियमित या तेलाने शरीराची मालिश केल्यास आपली त्वचा अनेक तणावापासून वाचू शकते.

- Advertisement -

तिळाचं तेल

हाडांच्या मजबूतीसाठी आणि डोकं शांत ठेवण्यासाठी तिळाच्या तेलाची मालिश करण्यापेक्षा उत्तम काही असूच शकत नाही. तीळाच्या बियांपासून बनवले जाणारे तिळाचे तेल मॅग्नेशियम, कॅल्शियम, कॉपर, ओमेगा ३ फॅटी अ‍ॅसिड आणि प्रोटीन या पोषक तत्वांनी परिपूर्ण असतं. तिळाचं तेल त्वचा माइश्चराइज करण्यास मदत करतं आणि यामधील व्हिटॅमिन ई त्वचेवरील स्ट्रेच मार्क्स कमी करण्यासोबतच वाढत्या वयासोबत शरीरावर येणा-या सुरकुत्या किंवा बदल रोखण्यास देखील मदत करतं.

बदामाचं तेल

आलमंड ऑईल म्हणजेच बदामाचं तेल हे अत्यंत लोकप्रिय मसाज ऑईल आहे. हलक्या पिवळ्या रंगाचं हे तेल हातांवर अगदी सहज पसरतं आणि आपली त्वचा देखील अगदी लगेच हे तेल खेचून स्वत:त शोषून घेते. व्हिटॅमिन ई ने परिपूर्ण असल्यामुळे हे तेल त्वचेला सुर्याच्या हानीकारक किरणांपासून होणारे नुकसान व अकाली वृद्धत्व येण्यापासून बचाव करू शकते. यातील पॉवरफुल अ‍ॅंटीफंगल गुण एथलीट फुट्सची समस्या दूर करण्यास प्रभावशाली आहे. यासोबतच हे तेल नायटा, एक्जिमा व सोरायसिस सारख्या फंगल इन्फेक्शनपासून बचाव करण्यासही मदत करतं.

मोहरीचं तेल

मोहरीचं तेल थोडसं चिकट असतं पण मालिशसाठी हे सर्वोत्तम तेल मानलं जातं. हे तेल सूज व वेदना दूर करण्यासाठी लाभदायक असतं. खासकरून पावसाळ्यात गरम गरम मोहरीच्या तेलाने शरीराची मालिश केल्यास त्वचेचा कोरडेपणा दूर होतो. मोहरीच्या तेलामध्ये ओमेगा ३ फॅटी अ‍ॅसिड असते. यामुळे शरीरातील संधिवात कमी होतो. आणि म्हणूनच आर्थरायटीसच्या रुग्णांना या तेलाच्या मालिशने आराम मिळतो. पण हे तेल डोळ्यांजवळ लावू नका, यामुळे डोळ्यांची जळजळ होऊ शकते.

तेलाने बॉडी मसाज करताना ‘या’ टिप्स वापरा

  • सकाळी अंघोळ करण्याच्या 30 मिनिटे आधी शरीराची तेलाने मालिश करणं अत्यंत लाभदायक असतं.
  • आपल्या हातांवर थोडंसं तेल घेऊन पूर्ण शरीरावर त्या तेलाने 15 मिनिटे हळू हळू मालिश करत राहा.
  • ज्यामुळे तेल त्वचेत व्यवस्थित शोषले जाते आणि व्यवस्थित मुरते.
  • शरीराला चांगले परिणाम हवे असतील तर एक महिना हा उपाय नक्की ट्राय करा.
  • यामुळे शरीराच्या अंतर्गत व बाहेरील दोन्ही अवयवांना भरपूर लाभ मिळतील. तसेच शरीराला थकवा जाणवणार नाही.

हेही वाचा : 

- Advertisment -

Manini