Thursday, May 2, 2024
घरमानिनीBeautyकेसांसाठी घरीच बनवा 'हे' औषधी तेल

केसांसाठी घरीच बनवा ‘हे’ औषधी तेल

Subscribe

दिवसेंदिवस प्रदूषणाचं प्रमाण वाढत आहे ज्यामुळे आरोग्यासोबतच केस आणि त्वचेवर देखील त्याचा वाईट परिणाम पाहायला मिळतो. केसांची निगा राखताना अनेक केमिकलयुक्त प्रोडक्ट्सचा वापर केला जातो. मात्र, अनेकदा यांच्या वापरामुळे केसांची मुळं कमकुवत होतात. यावर उपाय म्हणून आठवड्यातून एकदा किंवा दोनदा तेलाने मसाज करणं गरजेचं आहे. यासाठी आज आम्ही तुम्हाला घरीच केसांसाठी तेल कसे बनवायचे हे सांगणार आहोत.

मजबूत केसांसाठी औषधी तेल

5 Hair Oils for Strong and Healthy Hair

- Advertisement -
  • खोबरेल तेलात मेथीदाणे घालून चार-पाच दिवस तसेच ठेवा. त्यानंतर गाळून तेल बाटलीत घाला. हे तेल अधिक उपयुक्त झालेलं असेल. या तेलामुळे केसांचे आरोग्य चांगले राहते, इन्फेक्शन कमी होते, तेसच केसांमध्ये कोंडा होत नाही.
  • तिळाच्या तेलात मेथीदाणे भिजत घाला. आता हे तेल मंद आचेवर गरम होऊ द्या. तेल गार झाल्यावर गाळून मेथीदाणे बाजूला करा. आता हे तेल अधिक औषधी आणि परिणामकारक आहे.या तेलामुळे केस गळण्याचे प्रमाण कमी होते.

Amla oil: Does it really work for hair growth?

  • सुकलेला आवळा तेलात मिसळून तेल उकळू द्या. थंड झाल्यावर आवळ्यासहीत तेल बाटलीत भरा. या तेलाने केसांना मालिश केल्यास केस मुळांपासून पक्के होतात आणि केस गळणे कमी होते.
  • आवळा केसांसाठी खूप उपयुक्त आहे. यासाठी सुरुवातीला आवळे उकळवा. हे मऊसर आवळे कुकरमध्ये ठेवून चार-पाच शिट्या करा. आवळ्याचा गर निघेल. हा गर गाळून घ्या. आता या मिश्रणात हवं ते तेल एकत्र करा आणि अर्धा तास गरम करा. थंड झाल्यावर तेल बाटलीत भरून ठेवा. या तेलानं केलेला मसाज अधिक चांगले परिणाम देईल.या तेलाचा नियमित वापर केल्यास केसांचा पोत सुधारतो. केस लवकर पांढरे होत नाहीत.केस घनदाट होतात.
  • खोबरेल तेलात बदाम मिसळा आणि तेलाला चांगली उकळी येऊ द्या. उकळी आल्यानंतर तेलाचा रंग बदलेल. रंग बदलल्यावर तेल आचेवरून उतरवा आणि थंड झाल्यावर बाटलीत भरून ठेवा. आठवड्यातून 1-2 वेळा या तेलाने मसाज केल्यास केसांची चमक वाढते.

 

- Advertisement -

हेही वाचा :

केस काळे करण्यासाठी करा जास्वंदीच्या फुलांचा वापर

- Advertisment -

Manini