Thursday, February 22, 2024
घरमानिनीBeautyब्लॅक अंडरआर्म्सने त्रस्त आहात? 'हे' करा उपाय

ब्लॅक अंडरआर्म्सने त्रस्त आहात? ‘हे’ करा उपाय

Subscribe

महिलांसाठी ब्लॅक अंडरआर्म्स ही एक मोठी समस्या आहे. ब्लॅक अंडरआर्म्स असल्यामुळे अनेकजणी स्लीवलेस ड्रेस घालणं शक्यतो टाळतात. मात्र, आता या समस्येवर तुम्ही घरच्या घरी काही घरगुती उपाय करु शकता आणि ब्लॅक अंडरआर्म्सपासून सुटका मिळवू शकता.

‘या’ घरगुती उपायांनी दूर करा ब्लॅक अंडरआर्म्स

Tips and home remedies to get rid of dark underarms | HealthShots

- Advertisement -

 

  • दूध

दूध क्लिंजिंग प्रमाणे काम करते. दूधामध्ये केशर मिसळून हे मिश्रण ब्लॅक अंडरआर्म्सवर लावल्याने डार्कनेस कमी होतो.

- Advertisement -
  • बटाटा

अंडरआर्म्सवर बटाटा हा एक रामबाण उपाय आहे. बटाटा हा ब्लीचिंगचे काम करतो. काळे अंडरआर्म्स झाले असल्यास त्यावर बटाट्याने स्क्रब केल्याने काळे डाग दूर होण्यास मदत होते.

  • बेकिंग सोडा

बेकिंग सोडा आणि पाणी एकत्र करुन त्याची पेस्ट तयार करावी. ही पेस्ट अंडरआर्म्सवर लावल्याने डार्कनेस कमी होतो. तसेच लवकर फरक हवा असल्यास पाण्याऐवजी गुलाब पाण्याचा वापर करावा.

Getting Rid of Dark Armpits for Smooth, Even skin | Clinikally

  • खोबरेल तेल

खोबरेल तेलात लिंबाचा रस आणि थोडेसे दही एकत्र करुन याचे मिश्रण अंडरआर्म्सवर लावावे. यामुळे काळपटपणा दूर होऊन तेथील त्वचा क्लिन होते.

  • चंदन

चंदनाची पावडर आणि गुलाब पाणी एकत्र करुन त्याची तयार पेस्ट अंडरआर्म्सवर लावावी. त्यानंतर 8-10 मिनिटांनी स्वच्छ करुन घ्यावे यामुळे काळे डाग दूर होतात.

 


हेही वाचा :

चमकदार आणि कोमल त्वचेसाठी बेसनाचे ‘हे’ 5 फेसपॅक करा ट्राय

- Advertisment -

Manini