Saturday, December 9, 2023
घरमानिनीFashionचिकनकरी कुर्तीसोबत 'अशी' डिझाईन करा ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी

चिकनकरी कुर्तीसोबत ‘अशी’ डिझाईन करा ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी

Subscribe

ऑक्सिडाइज्ड ज्वेलरीची फॅशन सध्या ट्रेंडमध्ये आहे. तसेच सोन्याचे किंवा रंगीबेरंगी दागिने घालण्यापेक्षा हल्ली मुलींना ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी घालायला जास्त आवडते. कारण ही ज्वेलरी वेस्टर्न आणि इंडियन अशा दोन्ही प्रकारच्या आऊटफिटवर घालता येते. या ज्वेलरीची खास गोष्ट म्हणजे यामध्ये तुम्हाला लांब, शॉर्ट आणि चोकर नेकलेसच्या वेगवेगळ्या डिझाइन्स मिळतील. तसेच तुम्ही जेव्हा चिकनकारी सूट किंवा ड्रेस घालता तेव्हा त्यावर ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी घाला. यामुळे एक छान लूक तुम्हाला मिळेल.

लांब नेकलेस सेट

HOW TO WEAR OXIDISED JEWELLERY WITH DIFFERENT OUTFIT!

- Advertisement -

जर तुम्हाला काही नवीन ट्राय करायचे असेल तर तुम्ही लांब नेकलेस सेट घालू शकता. तसेच यामध्ये तुम्हाला एक मोठे पेंडेंट मिळेल. आणि यासोबत एक साधी साखळी मिळेल ज्याचा वापर तुम्ही दुसरं पेंडंटसाठी करू शकता. तुम्ही तुमच्या चिकनकारी सूटसोबत या प्रकारच्या नेकलेसचा सेट करू शकता. यासोबत तुम्हाला हवं असल्यास, तुम्ही लहान पेंडेंट असलेला सेटही खरेदी करू शकता आणि त्यावर हा नेकलेस स्टाइल करू शकता. अशाप्रकारचे ऑक्सिडाइज्ड ज्वेलरीचा सेट तुम्हाला १०० ते २०० रुपयांना बाजारात मिळेल.

चोकर नेकलेस सेट

- Advertisement -

जर तुमच्या चिकनकारी कुर्तीच्या गळ्याची डिजाईन डीप असेल तर तुम्ही त्याच्यावर चोकर नेकलेस घालू शकता. तसेच या प्रकारचा नेकलेस जर हेवी लूक देणारा असेल तर तो नेकलेस त्या ड्रेसेसवर खूप चांगला दिसतो आणि त्यामुळे तुम्हाला एक स्टायलिश लुक मिळतो. तसेच या चोकर नेकलेसमध्ये तुम्हाला हलक्या आणि जड डिझाइन्स मिळतात. तुम्हाला हव्या त्या डिझाइन्समध्ये तुम्ही हे नेकलेस घालू शकता. जेवढा नेकलेस छान असेल तेवढा त्याचा लूक बदलेले.

कुर्तीसोबत अशा स्टाईल करा ऑक्सिडाइज्ड बांगड्या

अनेक वेळा ज्वेलरी सेट कुर्तीसोबत चांगले दिसत नाहीत. अशा वेळी तुम्ही यावर फक्त बांगड्यांची स्टाईल करू शकता. तसेच चिकनकारी कुर्तीवर बांगड्या देखील खूप छान दिसतात. या बांगड्यांमध्ये तुम्हाला अनेक डिझाईन्स देखील मिळतात. जसा तुमचा ड्रेस असेल किंवा जसा कुर्तीचा प्रकार असेल त्यानुसार तुम्ही त्यावर बांगड्या स्टाईल करू शकता. तसेच बांगड्या जर का तुम्हाला जास्त घालायला आवडत नसतील तर त्यावर तुम्ही हेवी ऑक्सडाइजस बांगडी सारखं कड त्यावर घालू शकता. यामुळे हाताची शोभा वाढेल आणि सिम्पल सोबर लूकमूळे तुम्ही सुद्धा सुंदर दिसू शकता.


हेही वाचा : ब्लॅक आउटफिटसोबत स्टाइल करा ‘ही’ ज्वेलरी

- Advertisment -

Manini