घरक्राइमMumbai News: मुंबईतील सायन कोळीवाड्यात गोळीबार

Mumbai News: मुंबईतील सायन कोळीवाड्यात गोळीबार

Subscribe

मुंबईतील सायन कोळीवाडा परिसरात गोळीबार झाला आहे.

मुंबई: मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईतील सायन कोळीवाडा परिसरात गोळीबार झाला आहे. या गोळीबारात एक जण गंभीर जखमी झाला आहे. पैशाच्या व्यवहारावरुन झालेल्या भांडणामुळे हा गोळीबार करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. या गोळीबारानंतर परिसरात तणावाच वातावरण आहे. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. संबंधित घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. मुंबई पोलीस तसंच गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांकडून या संदर्भात सध्या तपास सुरू आहे. आज, पहाटे पाच वाजता हा गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे. (Mumbai News Firing at Sion Koliwada in Mumbai)

पहाटे दार वाजवलं, उघडचाच गोळीबार (Mumbai Fire Koliwada)

सायन कोळीवाडा परिसरातील एका घरात पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. दोन व्यक्तींच्या अंतर्गत वादातून हा गोळीबार घडल्याचं समोर आलं आहे. आकाश स्वामी असं गोळीबारात जखमी झालेल्या तरुणाचं नाव असून विवेक चेत्तियार असं गोळीबार करणाऱ्या आरोपीचं नावं आहे. आकाश स्वामी हा सायन कोळीवाडा परिसरातील एका चर्चच्या बाजूच्या परिसरामध्ये एकटाच घरात राहत होता. आज, शनिवार पहाटे पाचच्या सुमारास आरोपी विवेक आकाशच्या घरी गेला आणि दरवाजा वाजवला.

- Advertisement -

आकाशने दरवाजा उघडताच आरोपी विवेकने त्याच्या हातातील बंदूक ताणून आकाशवर दोन राऊंड फायर केले, अशी माहिती समोर आली आहे. आरोपीने आकाश स्वामीच्या पोटात गोळी झाडल्याचं समोर आलं आहे. गोळी लागल्यामुळे आकाश गंभीररित्या जखमी झाला असून त्याच्यावर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

गोळीबाराचं कारण काय?

आरोपी विवेक आणि गोळीबारात जखमी झालेला आकाश या दोघांमध्ये दारू पिताना काही वाद झाला होता आणि त्याच वादातून हा गोळीबार झाल्याची माहिती मिळत आहे. जखमी आकाश स्वामीवर 2017 साली हत्येचा प्रयत्न केल्याचा एक गुन्हा दाखल आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -