World Chocolate Day 2022: जगात चॉकलेटचे सर्वाधिक उत्पादन कुठे होते? जाणून घ्या

World Chocolate Day 2022: जगात चॉकलेटचे सर्वाधिक उत्पादन कुठे होते? जाणून घ्या

World Chocolate Day: आज जागतिक चॉकलेट दिवस साजरा करण्यामागचे कारण काय? जाणून घ्या

आजच्या युगात कोणतंही सेलिब्रेशन असो किंवा किंताही सण असो ते साजरं करताना हमखास चॉकलेट आणलं जातं. अनेकांना चॉकलेट खायला आवडतं त्याप्रमाणे काहींना चॉकलेट भेट म्हणून द्यायला सुद्धा आवडतात. आजकाल प्रत्येक आनंदाच्या प्रसंगी एकमेकांना चॉकलेट देण्याचा ट्रेंड सेट झाला आहे. चॉकलेट प्रेमींसाठी आजचा दिवस खास आहे.
‘वर्ल्ड चॉकलेट डे'(World Chocolate Day) दरवर्षी ७ जुलै रोजी साजरा केला जातो. चॉकलेट(chocolate) खाण्याचे काय फायदे आहेत किंवा चॉकलेटचे कोणते प्रकार आहेत या विषयी नेहमी बोललं जातं. पण ‘वर्ल्ड चॉकलेट डे’ कधीपासून साजरा केला जातो आणि तो का साजरा केला जातो हे जाणून घेऊया. आणि कोणत्या देशात जास्त चॉकलेट खातात हे सुद्धा जाणून घेऊया.

हे ही वाचा –  नाश्ता किंवा लंच ऐवजी ‘ब्रंच’ करण्याचा नवा ऑप्शन किती फायदेशीर ? जाणून…

हे ही वाचा – पावसाळ्यात मका खाणे आहे आरोग्यवर्धक, जाणून घ्या फायदे

‘वर्ल्ड चॉकलेट डे’ कधी सुरु झाला?

‘वर्ल्ड चॉकलेट डे'(World Chocolate Day) हा दरवर्षी ७ जुलै रोजी साजरा करण्यात येतो. जगभरातच हा दिवस साजरा केला जातो. २००९ ‘वर्ल्ड चॉकलेट डे’ साजरा करण्यास सुरुवात झाली. हा दिवस १५५० मध्ये युरोपात चॉकलेटचा वर्धापन दिन मनाला जातो. चॉकलेट तर सगळेच खातात पण आजच्या दिवशी चॉकलेट खाण्याची मजा वेगळीच असते. चॉकलेट हा अँटिऑक्सिडंट्स चा उत्तम स्रोत आहे असंही काही अहवालांमधून समोर आले आहे. चॉकलेटचे सेवन केल्याने रक्तप्रवाह सुधारतो. त्याचबरोबर हृदयविकाराचा धोका ही कमी होतो. चॉकलेटचा वापर करून हल्ली बाजारात अनेक उत्पादने उपलबद्ध आहेत.

हे ही वाचा –  कॉफी आणि व्यक्तिमत्त्व, काय आहे नातं? जाणून घ्या…

चॉकलेट

एका रोपोर्ट नुसार, जगात सर्वाधिक चॉकलेटचा खप हा स्वित्झर्लंड मध्ये होतो. ८.८ किलो दरडोई वार्षिक वापर या देशात होतो. स्वित्झर्लंड या यादीत आघाडीवर आहे. स्वित्झर्लंड हा देश त्यांच्या उत्तम चॉकलेट उद्योगासाठी जभरात ओळखला जातो. स्वित्झर्लंड हा देश चॉकलेटच्या उत्पादनात आघाडीवर आहे. स्वित्झर्लंडचे शेजारील देश ऑस्ट्रिया आणि जर्मनी देखील ८. १ आणि ७. ९ सह या यादीत दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत. पण यातील सर्वात महत्वाची बाब म्हणजे या यादीत भारत टॉप १० मध्ये सुद्धा नाही पण तरीही भारतात चॉकलेट खाण्याचे आणि चॉकलेट भेटवस्तू म्हणून देण्याचे प्रमाण जास्त आहे. त्याचप्रमाणे भारतात सण आणि समारंभांमध्येही चॉकलेट खाण्याचे प्रमाण जास्त आहे.

हे ही वाचा – Receipe : पावसाळ्यात घ्या गरमागरम टोमॅटो सूपचा आस्वाद

First Published on: July 7, 2022 3:37 PM
Exit mobile version