पावसाळा आला की सर्वांनाच काहीतरी चटपटीत गरमागरम खावसं वाटतं. अशावेळी अनेकजण पौष्टिक आणि चवदार गोष्टी खाणं पसंत करतात. अशावेळी तुम्ही टोमॅटो सूपचा वापर करू शकता.
टोमॅटो सूप बनवण्यासाठी लागणारे साहित्य :
- 500 ग्रॅम टोमॅटो
- 1 चमचा जीरे
- 1 चमचा साखर (आवडीनुसार)
- 1 चमचा तेल
- 3 हिरव्या मिरच्या
- 1 चमचा चिरलेलं आलं
- 1 चमचा चिरलेला लसूण
- 1 चमचा गरम मसाला
- बारीक चिरलेली कोथिंबीर
- चवीनुसार मीठ
- Advertisement -
कृती :
- सर्वप्रथम टोमॅटो स्वच्छ धुऊन बारीक चिरून घ्या.
- त्यानंतर त्यात टोमॅटो आलं, लसूण, हिरवी मिरची कापून मध्यम आचेवर गरम मसाला घालून शिजवून घ्या.
- त्यानंतर त्यात गरजेनुसार थोडं पाणी घालून उकळत ठेवा.
- मंद आचेवर १५ ते २० मिनिटे टोमॅटो शिजेपर्यंत वाफवून घ्या.
- आता हे मिश्रण गाळून घ्या.
- एका भांड्यात तेल गरम करून त्यात जीरे घाला, त्यात गाळलेले टोमॅटोचे मिश्रण घाला त्यात चवीनुसार मीठ घाला.
- हे मिश्रण उकळत ठेवा, नीट उकळल्यानंतर गॅस बंद करून त्यावर कोथिंबीर घालून सजवा आणी गरमागरम सर्व्ह करा.
हेही वाचा :Receipe : पौष्टिक रव्यापासून बनवा चविष्ट पिझ्झा
- Advertisement -
- Advertisement -