घरमनोरंजननाच गं घुमा’ गाण्यावर अमृतासह प्रसाद-मंजिरीचा डान्स

नाच गं घुमा’ गाण्यावर अमृतासह प्रसाद-मंजिरीचा डान्स

Subscribe

मराठी इंडस्ट्रीत प्रामुख्यानं महिलांवर आधारित सिनेमे मागील काही महिन्यांपासून मोठ्या पडद्यावर पाहायला मिळत आहेत. ‘बाईपण भारी देवा’, ‘झिम्मा 2’ या सिनेमानं मोठ्या पडद्यावर सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. असाच एक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे तो म्हणजे ‘नाच गं घुमा’. महिलांच्या अवतीभवती घडणाऱ्या आणि त्यांच्याशी संबंधित अनेक छोट्या-मोठ्या गोष्टी या सिनेमात दाखवण्यात आल्या आहेत.

नुकताच या चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातील गाणी सुपरहिट झाली आहेत. ‘नाच गं घुमा’, ‘गडबडगीत’ ही गाणी सध्या ट्रेडिंगला आहेत. त्यामुळे या गाण्यांवर कलाकार मंडळींसह नेटकरी भन्नाट व्हिडीओ करताना दिसत आहेत. त्यामुळे सिनेमाच जोरदार प्रदर्शन सुरु आहे. अभिनेत्री अमृता खानविलकरसह, प्रसाद ओक, मंजिरी ओक यांनी नाच गं घुमा चित्रपटाला शुभेच्छा देण्यासाठी जबरदस्त व्हिडिओ केली आहे. तो त्यांचा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

- Advertisement -

प्रसाद ओकची पत्नी मंजिरी ओकने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओ मध्ये अमृता खानविलकरसह प्रसाद आणि मंजिरी दिसत आहेत. तसेच व्हिडीओत, प्रसादचा मजेशीर अंदाज पाहायला मिळत आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून तिघांनी ‘नाच गं घुमा’च्या टीमला शुभेच्छा दिल्या आहेत. अमृता, प्रसाद, मंजिरीच्या या व्हिडीओवर इतर कलाकार मंडळींसह चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Manjiri Oak (@manjiri_oak)

 मुक्ता बर्वे आणि नम्रता संभेराव यांच्याबरोबरच सिनेमात अभिनेता सारंग साठ्ये देखील प्रमुख भुमिकेत आहेत. त्याचप्रमाणे सुकन्या मोने, सुप्रिया पाठारे, मधुगंधा कुलकर्णी, शर्मिष्ठा राऊत या अभिनेत्री देखील दमदार भुमिकेत आहेत. तर स्वप्नील जोशी आणि परेश मोकाशी यांनी सिनेमाची निर्मिती केली आहे. त्याचप्रमाणे हे दोघे सिनेमाचे दिग्दर्शक देखील आहेत.

- Advertisement -

परेश मोकाशी आणि मधुगंधा कुलकर्णी या जोडीनं याआधी अनेक हिट सिनेमे मराठी सिनेसृष्टीला दिले आहेत. त्यात ‘वाळवी’ हा सिनेमा चित्रपटगृहांमध्ये प्रचंड गाजला. त्याआधी ‘हरीश्चंद्राची फॅक्टरी’, ‘एलिझाबेथ एकादशी’, ‘चि सौ कां’, ‘आत्मपॅम्प्लेट’ सारख्या दमदार सिनेमांची निर्मिती आणि दिग्दर्शन त्यांनी केलं.

हेही वाचा : चंद्रकांत पवार दिग्दर्शित “अप्सरा” १० मे रोजी चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात होणार प्रदर्शित

__________________________________________________________________

Edited By : Nikita Shinde

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -