Nawab Malik Case : गोवावाला कंपाऊंडच्या व्यवहारात मलिकांचे डी गँगशी संबंध: ED च्या दोषापत्रानंतर कोर्टाचं निरीक्षण

Nawab Malik Case : गोवावाला कंपाऊंडच्या व्यवहारात मलिकांचे डी गँगशी संबंध: ED च्या दोषापत्रानंतर कोर्टाचं निरीक्षण

संग्रहित छायाचित्र

मनी लाँड्रिंगच्या (money laundering case) आरोपांचा सामना करत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक (ED on Nawab Malik) यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. विशेष न्यायालयाने नवाब मलिकविरुद्धच्या खटल्याची सुनावणी करताना ईडीने सादर केलेल्या आरोपपत्राची दखल घेतली. यावर कोर्टाने नवाब मलिक यांचे डी-गँगशी (d company) संबंध होते असं निरीक्षण नोंदवलं आहे. नवाब मलिक (Nawab Malik) यांचा थेट मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्यात सहभाग होत असेही न्यायालयाने म्हटले आहे. याशिवाय नवाब मलिकांनी गोवावाला कंपाऊंड मिळवण्यासाठी कट रचल्याचा ठपका ईडीने ठेवला आहे. मंत्री नवाब मलिक यांनी हसीन पारकरसोबत वारंवार बैठका घेतल्या आणि मनी लाँड्रिंग केलं असं निरीक्षणही कोर्टाने नोंदवलं आहे.

या प्रकरणाची सुनावणी विशेष न्यायाधीश आर.एन.रोकडे यांच्या खंडपीठासमोर झाली. यावेळी न्यायाधीश रोकडे यांनी असे निरीक्षण नोंदवले की, या प्रकरणाचा पाठपुरावा करण्यासाठी पुरेशी कारणे आहेत. या प्रकरणात नवाब मलिक यांना जाणीवपूर्वक सहभागी करून घेण्यात आल्याचे प्रथमदर्शनी पुरावे समोर आले आहेत.

Nawab Malik : नवाब मलिक यांच्या ८ मालमत्ता ED मार्फत जप्त

वास्तविक, 21 एप्रिल रोजी ईडीने मलिक यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले होते. कुर्ल्यातील गोवावाला कंपाऊंड ताब्यात घेण्यासाठी नवाब मलिक आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहीण हसिना पारकर आणि त्याचा अंगरक्षक सलीम पटेल यांच्यात अनेक बैठका झाल्या. दरम्यान नवाब मलिकांचे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या डी गँगमधील लोकांसोबत संबंध असल्याचे निरीक्षण नोंदवले गेल्याने त्यांच्या अडचणी अधिक वाढण्याची शक्यता आहे.

नवाब मलिक यांचे मनी लाँड्रिंगचं प्रकरण नेमकं काय? 

फेब्रुवारी महिन्यांत राष्ट्रीय तपास पथकाने अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम, अनिस इब्राहिम, छोटा शकील, जावेद पटेल ऊर्फ जावेद चिकना, टायगर मेमन यांच्यासह इतर आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविला होता. यावेळी या अधिकार्‍यांनी दाऊदसह त्याची बहीण हसीना पारकर यांच्या कथित गैरव्यवहारासह जमीन खरेदी-विक्रीच्या काही प्रकरणांचा तपास सुरू केला होता. (nawab malik news)

याचदरम्यान कुर्ला येथील गोवावाला कंपाऊंड येथील संपत्ती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी खरेदी केल्याचे उघडकीस आले होते. ही जमीन दाऊद इब्राहिमशी संबंधित सहकारी आणि नातेवाईकांच्या नावे होती. ती जमीन नंतर नवाब मलिक यांच्याकडून खरेदी करण्यात आली होती. (ED on Nawab Malik) याच प्रकरणात ईडीने गुन्हा नोंदवून नवाब मलिक यांची कसून चौकशी केली होती. या चौकशीनंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली होती. याच गुन्ह्यांत ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.

मलिक यांचे अंडरवर्ल्ड कनेक्शन

अटकेनंतर ईडीच्या अधिकार्‍यांनी गोवावाला कंपाऊंड परिसरातील पाहणी, पंचनामा करुन काहींची चौकशी केली होती.त्यांची जबानी नोंदविण्यात आली होती. त्यानंतर नवाब मलिक यांच्यावर मनी लाँड्रींगप्रकरणी गुन्हा नोंदवून त्यांच्या गोवावाला कंपाऊंड, कुर्ला आणि वांद्रे येथील संपत्ती जप्त करण्यात आली होती.


हेही वाचा : नवाब मलिक यांना रुग्णालयातून डिस्चार्ज, 3 मार्चपर्यंत ईडीच्या कोठडीतच


First Published on: May 21, 2022 8:54 AM
Exit mobile version