एवढा मोठा पोलीस फौजफाटा मी कधीच पाहिला नाही, सुरतला पोहोचल्यावर नितीन देशमुखांनी कशी केली सुटका?

एवढा मोठा पोलीस फौजफाटा मी कधीच पाहिला नाही, सुरतला पोहोचल्यावर नितीन देशमुखांनी कशी केली सुटका?

एकनाथ शिंदे यांनी आमदारांना अंधारात ठेवून त्यांना सूरतमध्ये नेल्याचा आरोप आमदार नितीन देशमुख यांनी केला आहे. कैलास पाटील यांनी आपली सुटका कशी झाली याची माहिती दिल्यानंतर नितीन देशमुख यांनी त्यांच्यासोबत घडलेल्या थरारक घटनेची माहिती पत्रकार परिषदेत दिली. भाजपने कटकारस्थान करून महाविकास आघाडी सरकारला पाडण्याचा डाव आखल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. (Nitin Deshmukh Revealed his return journey from surat)

हेही वाचा – ज्यांनी आमदार केलं त्यांच्याशी गद्दारी नाहीच, सूरत सुटकेची कैलास पाटलांनी सांगितली आपबिती

नितीन देशमुख यांनी अशी करून घेतली स्वतःची सुटका

२० तारखेला विधान परिषदेचा निकाल लागल्यानंतर एकनाथ शिंदेंनी बंगल्यावर बोलावलं असल्याची सूचना मिळाली. त्यामुळे शिंदे साहेबांचा आदेश म्हणून लगेच गाडीत बसलो आणि ठाण्यात आलो. माझ्यासोबत कोल्हापुरचे आमदार प्रकाश सोबत होते. ठाणे गेल्यानंतर गाडी पालघरला गेली. तिकडे गेल्यावर सांगण्यात आलं की पालघरचे आमदार श्रीनिवास वाणगा यांच्या घरी जायचं असल्याचं सांगण्यात आलं. पण तिथे न थांबला पालघरमध्ये एका हॉटेलमध्ये थांबवण्यात आलं. तिथे चहा-पाणी घेण्यात आला. तेव्हा माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली. सरकारविरोधात काही मोठं कटकारस्थान रचलं असल्याचं वाटू लागलं. त्यामुळे तिथल्या टपरीवाल्याला हा रस्ता कुठे जातो, असं विचारलं. हा रस्ता थेट गुजरातला जात असल्याचं त्या टपरीवाल्याने सांगितलं. तेवढ्यात तिथे आणखी तीन मंत्री आले. त्या मंत्र्यांना घेऊन गाडी गुजरातच्या दिशेने जाऊ लागली. तेव्हा त्यांच्या फोना-फोनी सुरू झाले. हा आमदार आला का, तो आमदार आला का याची चौकशी सुरू झाली. तेव्हा मला खात्री पटली हे काहीतरी सरकारविरोधात डाव सुरू आहे. आम्ही आमच्यासोबत कपडे वगैरे काही आणले नव्हते. तेव्हा तुम्ही कसली काळजी करू नका असं आम्हाला सांगण्यात आलं. तेवढ्याच लगेच खबर मिळाली की कैलास गायब झाला. कैलास गायब झाल्याची माहिती कळताच, मला बरं वाटलं. ही परिस्थिती काय सुरू आहे, याची कल्पना नव्हती. त्यामुळे मी लगेच उद्धव साहेबांना मॅसेज करून ठेवला. मी सूरतवरून परत येईन, असं आश्वासन दिलं. सूरतला पोहोचल्यावर आमची फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये सोय करण्यात आली होती. तिथे खूप मोठा पोलीस फौजफाटा होता. मुंबईतही एवढा मोठा पोलीस फौजफाटा मी पाहिला नव्हता कधी. आपीएस अधिकारीही तिथे उपस्थित होते, असं नितीन देशमुख यांनी सांगितलं.

आणखी वाचा

तिथून पुढे माझ्या हार्ट अटॅकचा बनाव रचण्यात आला. मला कोणतीच व्याधी नाही. तरी मला हार्ट अटॅक आल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. आज मी आमदार असलो तरी मी शिवसेनेच्या भरोवश्यावर आमदार झालो. उद्धव साहेबांच्या आशिर्वादाने आमदार झालो आहे. बाळासाहेबांच्या आशिर्वादाने झालो आहे. मला माझ्या शिवसैनिकांनी निवडून दिलं आहे. माझ्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी निवडून दिलं आहे. त्यामुळे माझी तिथे असलेल्या आमदारांना विनंती आहे की, त्यांनी तुम्ही कोणत्याही आमिशाला बळी न पडता, ज्या सामान्य कार्यकर्त्यांनी तुमच्यासाठी जीवाचे रान केले. रात्रीचा दिवस केला त्यांचा तुम्ही विचार करा आणि मावळ्यांनो परत या. ही एवढीच तुम्हाला विनंती करतो. शिंदे साहेबांनाही विनंती करतो की त्यांनी भाजप कटकारस्थान रचत आहे. आपण बाळासाहेबांचे मावळे आहोत. आपण जिल्हा प्रमुख होते, शिवसेनेचे नेते होते आता मंत्री आहात. ज्या बाळासाहेबांनी आपल्याला प्रेम दिले त्या बाळासाहेबांची आठवण ठेवून तुम्ही परत या, अशी कळकळीची विनंतीही नितीन देशमुख यांनी केली.

हेही वाचा 

अशा अफवा परसवल्या जातात की, हे सरकार हिंदुत्ववादी नाही, राष्ट्रवादी आहे. म्हणून तुम्हाला हे सरकार नको होते तर तुम्ही उद्धव साहेबांकडे जाऊन राजीनामे द्यायला हवे होते. ज्या प्रकारे परभणीच्या खासदारांनी आपले मत व्यक्त करून आपला राजीनामा दिला. त्याप्रकारे तुम्ही राजीनामा द्यायला हवा होता. पण ही कोणती पद्धत आहे की पळून ज्यायचे? ही पद्धत चुकीची असून फसवणूक आहे.

हेही वाचा ‘धनुष्यबाण’ मिळवण्यासाठी शिंदेंकडून कायदेशीर लढाई सुरू? मूळ पक्षासाठी प्रयत्न करणार

First Published on: June 23, 2022 3:14 PM
Exit mobile version